“कोरोना विरोधी लढ्यासाठी मोदी खूप मेहनत घेत आहेत”; सोशल मीडियावर भाजपा नेत्यांच्या पोस्टची ‘लाट’

“कोरोना विरोधी लढ्यासाठी मोदी खूप मेहनत घेत आहेत”; सोशल मीडियावर भाजपा नेत्यांच्या पोस्टची ‘लाट’

देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. दिवसोंदिवस रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. रुग्णालयामध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधं उपलब्ध नाहीयत. तसेच लसींच्या तुटवड्याचाही प्रश्न निर्माण झाला असून यासंदर्भातील बातम्या सातत्याने समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमे आणि भारतातील विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांवरुन टीका केली जात आहे.

मात्र आता पंतप्रधानांवर होणाऱ्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनासंदर्भातील काम करत असल्याचा उल्लेख असणारा एक लेख सोशल नेटवर्किंगवर शेअर करत सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. ‘द डेेली गार्डियन’ नावाच्या वेबसाईटवर मोदींच्या कामासंदर्भातील हा लेख प्रकाशित झाला असून भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी तो ट्विटरवरुन शेअर केलाय.

मोदी सरकारमधील मंत्र्यांनी आणि भाजपाच्या अनेक नेत्यांनी या लेखामधील काही मुद्द्यांचा उल्लेख करत त्याची लिंक आपल्या ट्विटरवरुन शेअर केली आहे. यामधून भारत सध्या करोना संकटाचा सामना करत असताना कशाप्रकारे पंतप्रधान मोदी मेहनत घेत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी केलाय. विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर न देता मोदी करोनासंदर्भातील काम करत असल्याचा दावा या लेखामधून करण्यात आला असून तो लेख भाजपाचे मंत्री सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना दिसत आहे.

भाजपा आय़टी सेलचे प्रमुख असणाऱ्या अमित मालवीय यांनी हा लेख शेअर केला आहे. “कोणाच्या तरी मृत्यूची बातमी किंवा रिकव्हरी होत नसल्याच्या बातम्या दाखवल्या जातात. मात्र आपल्याला ठाऊक आहे का ८५ टक्क्यांहून अधिक लोक घरीच ठीक होत आहेत. केवळ ५ टक्के लोकांची परिस्थिती चिंताजनक असून त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. मात्र देशात सध्या रिकव्हरी आणि डेथ रेटवर वाद सुरु आहे. या साथीसाठी कोणाला जबाबदार ठरवलं जावं यावर वाद सुरु आहे,” असं मालवीय यांनी म्हटलं आहे.

गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनीही लेख शेअर करताना, “संकट आल्यानंतर शांततेमध्ये काम करणाऱ्या पंतप्रधानांपैकी हे एक आहेत. राजकीय आरोपांवर ते उत्तर देत बसत नाहीत कारण त्यांच्याकडे यासाऱ्यासाठी वेळ नाहीय. पंतप्रधान मोदींविरोधात विरोधकांची सुरु केलेल्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका,” असं म्हटलं आहे.

संसदीय कार्यमंत्री असणाऱ्या प्रल्हाद जोशी यांनाही हा लेख शेअर करताना अमित मालवीय आणि जी. किशन रेड्डी यांनी वापरलेल्या ओळीच पोस्ट केल्यात.झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी या लेखाची लिंक शेअर केली आहे.तसेच केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनाही हा लेख शेअर केलाय.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत