कोरोना वायरस नंतर आता चीनमध्ये मंकी वायरस

कोरोना वायरस नंतर आता चीनमध्ये मंकी वायरस

Monkey virus in China now after Corona virus

कोरोना विषाणूवरून चीन आधीच जगाच्या निशाण्यावर आलेला आहे. चीनमुळेच जगात कोरोना विषाणू फैलावल्याचा आरोप केला जात आहे. मात्र आता कोरोनापेक्षाही मोठे संकट चीनमध्ये आले आहे.कोरोना विषाणूवरून चीन आधीच जगाच्या निशाण्यावर आलेला आहे. चीनमुळेच जगात कोरोना विषाणू फैलावल्याचा आरोप केला जात आहे. मात्र आता कोरोनापेक्षाही मोठे संकट चीनमध्ये आले आहे. चीनमध्ये मंकी बी व्हायरसचा शिरकाव झाला आहे. हा विषाणू हा अत्यंत घातक आहे, कारण या विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये मृत्यूदर हा ७० ते ८० टक्के आहे.

monkey092018


ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार चीनमधील बिजिंगस्थित एका प्राण्यांच्या डॉक्टराला मंकी बी विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चीनमध्ये या विषाणूचा मानवाला संसर्ग होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. मंकी बी विषाणूमुळे या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. मात्र या डॉक्टरचे नातेवाईक सुरक्षित आहेत. बिजींगमध्ये ५३ वर्षीय पशुचिकित्सकाने यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला दोन मृत माकडांची चिरफाड करून सर्जरी केली होती. ते गैर मानवी प्रायमेट्सवर संशोधन करणाऱ्या संस्थेसाठी काम करत होते.माकडांची सर्जरी केल्यानंतर एका महिन्याने या पशु चिकित्सकांना मळमळ सुरू झाली. तसेच उलटीसारखी प्राथमिक लक्षणे दिसू लागली. चीनमधील सीडीसी विकली इंग्लिश प्लॅटफॉर्म ऑफ चायनीज सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने शनिवारी याचा खुलासा केला होता. या नियतकालिकाने सांगितले की, संसर्ग झाल्यानंतर या पशु चिकित्सकाने अनेक रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी धाव घेतली. मात्र अखेरीस २७ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. चीनमध्ये मंकी बी विषाणूचा संसर्ग झाल्याची ही पहिली केस आहे.

25TB MONKEYS articleLarge

संशोधकांनी एप्रिलमध्ये या पशु चिकित्सकाचे Cerebrospinal Fluid ला एकत्र केले. ते मंकी व्हायरसने बाधित असल्याचे दिसून आले. मात्र या डॉक्टरच्या निकटवर्तीयांचे नमुने निगेटिव्ह आले. या विषाणूचा शोध १९३२ मध्ये लागला होता. हा विषाणू थेट संपर्क आणि शारीरिक स्त्रावांच्या देवाण-घेवाणीमुळे फैलावतो. चिंताजनक बाब म्हणजे मंकी बी व्हायरसमुळे रुग्णांमधील मृत्यूदर हा ७० ते ८० टक्के आहे. या नियतकालिकाने सांगितले की, माकडांमध्ये बीव्ही विषाणू धोका उत्पन्न करू शकतो. या विषाणूचा बीमोड करणे आणि चीनमध्ये प्रयोगशाळेचे देखरेख तंत्र मजबूत करणे आवश्यक आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत