कोरोना लढ्यात अभाविपचा पुढाकार

कोरोना लढ्यात अभाविपचा पुढाकार

कोरोना च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी कार्यरत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तत्परतेने आताही विविध सेवा- उपक्रम करत आहे. असाच एक उपक्रम त्यांच्याद्वारे राबवण्यात येत आहे त्याचे कौतुक सगळीकडे होते आहे .

Polish 20210412 183236303

आजची तरुण पिढी ही निष्कळजी आहे , त्यांना समाजाचे , स्वतःच्या आरोग्याचे काही एक पडलेले नाही असेच सर्वांकडून बोलले जाते . पण आजची पिढी ही खूप साहसी , तितकीच दमदार आहे आणि याचे उदाहरण म्हणजे अभाविप चे तरुण कार्यकर्ते . सध्या सगळीकडे कोरोनाने हैदोस मांडला आहे , अनेक ठिकाणी वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांचे प्राण जात आहेत . याच पार्श्वभूमीवर अभाविप च्या कार्यकर्त्यांना रात्री 12:00 ला एका विद्यार्थ्याची तब्येत बिघडल्याचे समजले , ज्याला कोरोना झाला होता . माणसातला माणूस इथेच पाहायला मिळाला . स्वतःची काळजी न करता PPE KIT घालून अभाविप चे कार्यकर्ते विद्यार्थ्याला घेऊन COVID सेंटरला घेऊन गेले. तिथे त्या विद्यार्थ्यासाठी बेड उपलब्ध करून देऊन उपचाराची सुविधा करण्यात आली.

आज अनेक ठिकाणी कोरोनामुळे होणारी जीवितहानी , लोकांना होणारा त्रास सर्वांना दिसत आहे . पण कोणत्याही शाबासकीची अपेक्षा न करता जीवावर उदार होऊन इतरांचे प्राण वाचवणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना द महाराष्ट्र न्यूजचा सलाम .

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत