कोरोना काळात बेरोजगारांसाठी ‘फिरती चहाचा’ आधार

कोरोना काळात बेरोजगारांसाठी ‘फिरती चहाचा’ आधार

'firati chaha' support for unemployed during Corona

नांदेड : कोरोना काळात अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला असताना नांदेड येथे कृषी सहाय्यक पदावर असलेल्या तरुणाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कोरोना काळात हक्काचा रोजगार मिळवून दिला. कोरोनासारख्या वातावरणात व्यवसाय, उद्योगधंदे बंद असताना ‘फिरती चहा’ नावाची ऑनलाइन चहा हॉटेल सुरु करुन पाच तरुणांना रोजगार उभा करून दिला. सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या ‘फिरती चहा’ या ऑनलाइन चहाला नांदेड शहरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

कोरोना महामारीत रोजगार हरवलेल्या नांदेड येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रसाद तोटवाड नावाच्या कृषी सहाय्यक पदावर असणाऱ्या तरुणाने आपल्या कल्पकतेच्या आधारे हा रोजगार मिळवून दिला. प्रसाद हे व्यवसायाने कृषी सहाय्यक असले तरी त्यांना उद्योगधंद्याविषयी नेहमीच रुची राहिली. त्यामुळे त्यांनी नोकरी करत करत अनेक मार्केटिंग कंपन्यामध्ये आपली गुंतवणूक करुन आपला व्यावसायिक स्तर वाढवण्याचा प्रयत्न केला. शासकीय नोकरी करत असताना उर्वरित वेळेत नेटवर्क मार्केटिंग, ऑनलाइन उद्योग, अशा विविध उद्योगा आधारे जास्तीचा नफा मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेयत.
त्यातून त्यांना महिन्याकाठी 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्नही मिळत होते. परंतु कोरोना महामारीमुळे हे उत्पन्न हळूहळू कमी होत ,बंद झाले.

कोरोना महामारीतून आणखी इतर मार्गाने उत्पन्न मिळवण्यासाठी व कोरोना काळात रोजगार गेलेल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी ‘फिरती चहा’ ही ऑनलाइन हॉटेलची संकल्पना मनात आणली आणि ऑनलाइन चहा विक्री सुरु केली. प्रसाद यांनी ऑनलाइन मार्केटिंगचा फंडा लक्षात घेऊन ऑनलाईन चहा विक्रीसाठी ‘फिरती चहा’ हॉटेलही सुरु केले. या फिरती चाय हॉटेलच्या माध्यमातून प्रसाद यांनी पाच सुशिक्षित तरुणांना रोजगार देऊन मदतीचा हात दिला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत