कोरोना आणि शेतकरी राजा…….

कोरोना आणि शेतकरी राजा…….


“उभ्या जगाचा पोशिंदा”.या नावाने ज्याला आतापर्यंत सर्व देश ओळखतो तोच तुम्हा आम्हा सर्वांचा “शेतकरी राजा” खरतर हा विषय घेताना मला पहिली कविता आठवली ती म्हणजे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची “शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप” सर्व शेतकरी माय _बाप यांचे वास्तव मांडणारी ही कविता या विषयावर लिहिताना कोणाला ही आठवल्या शिवाय राहणार नाही. आज देशात जवळ जवळ 7 ते 8 महिने कोरोना या रोगाने कहर माजवला आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण देशात lokdwoun केल आहे. यामधे सर्वाचे व्यापार, उद्योग, नोकरी, शिक्षण, शाळा कॉलेज, सर्व दुकाने, जवळ जवळ संपूर्ण कामधंदा बंद पडले. पन देशात – राज्यात असा एकमेव व्यक्ति आहे ज्याचे काम इतर दिवसात तर कधीच बंद नसते तर नसतेच पन या येवढ्या मोठ्या रोगात पूर्ण देश बंद असताना सुद्धा बंद नाही तो व्यक्ति म्हणजे आपला “शेतकरी राजा” . खरच आहे जो स्वतःचाच मालक असताना एक सुट्टी घेत नाही. स्वतःचे घर गळत असताना पावसाची वाट पाहत असतो. जो रात्र दिवस काबाडकष्ट करतो मेहनत घेत असतो, अशा राज्याला इतर वेळी मालाला चांगला भाव मिळत नाही तर या कोरोना काळात काय भाव मिळणार? विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर खर्या अर्थाने आपल्या देशात शेतकर्‍याला राजा मानले असते तर आपला देश कृषी प्रधान असून दुसर्‍या देशातून भले लोकसंख्या कोटीच्या घरात असली तरी धान्य आयात करण्याची वेळ कधीच आली नसती. रोगाचा शिरकाव आपल्या देशात होण्या अगोदर नेहमी एक वाक्य कानी ऐकू येत होते. ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी जगेल त्यादिवशी पूर्ण देश उपाशी असेल. खर आहे की हे जर राजाने अन्नधान्य पिकवले नाही तर देशातील लोकाना काय खायला मिळणार. जो कष्ट करतो त्याला त्याचा मोबदला मिळत नाही पण जे मध्ये दलाल असतात त्यानाच काही काम न करता मोबदला मिळतो ही कोणती रीत आहे खरच कळत नाही.
खरतर कोरोनाच्या काळात शेतकरी राजा कसा असेल याविषयी तर विचार करणेच बरा. सर्व बंद शेतातील कामे तर 12 महिने चालूच असतात. त्याला कधीच सुट्टी नसते. काम 12 महिने चालू म्हणजे त्यासाठी लागणारे साहित्य, यंत्र, आवश्यक असतात ते या काळात कसे मिळणार आता ऐनवेळी पावसाच्या काळात कोरोना मग पेरणीला सुरवात होते त्यासाठी लागणारे बी, खत, फवारणी साठी असलेले आवश्यकता खत, या सर्वांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे पण पुरवठा कमी प्रमाणात मग आहे तो माल आहे त्या किंमतीपेक्षा जास्त किंमत लावली जाते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर आधीच खाण्या पिण्याचे वांधे असताना त्यात जास्त किंमत लावलेले खत, बी – बियाणे. औषधे घेणे कसे शक्य होईल. हे सर्व स्व:ताच्या डोळ्याने पाहिले यामुळे बोलत आहे. या कोरोनाने सर्वांची बुड बसवली आहेत. अशीच. माझ्या ऐकण्यात एक केस आली अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिल्ह्यात तर पाथर्डी तालुक्यातील
एक शेतकरी इथे मालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे तो वाशीला गेला कारण तेथे त्या मालाला दुप्पट भाव मिळत होता. करायला गेला एक पण त्याच्या पदरी पडला कोरोना असच काही झाल. माल विकायला गेला आणि त्याला कोरोनाची लागण झाली. असे देशाच्या कानाकोपऱ्यात कितीतरी शेतकरी असतील ज्यांनी आपल्या मालाला भाव मिळावा त्यासाठी आपला जीव धोक्यात घातला असेल. जरी जिवाची त्यांना परवा वाटत असली तरी एकीकडे पोटापाण्यासाठी धडपड करावी लागते यामुळे असे पाउल त्यांना उचलणे गरजेच आहे.
हे झाल कोरोनाच्या काळातील आपल्या शेतकरी राज्याची व्यथा. तशी तर ती नेहमीच असते पण या रोगाच्या काळात ती अजून भीषण जिवावर बेतणारी झाली आहे. चांगल्या गोष्टींच्या बाबतीत आपण नेहमी बोलतो ना “भगवान जब देता है तब् ओ छप्पर फाडके देता है” खरतर जा डायलॉग यावेळी आठवण थोड सर्वानाच पचायला जड जाईल पण इथे हा डायलॉग मला चांगल्या बाबतीत नाही तर वाईट बाबतीत आठवला कारण देवाने तर कोरोना सारखा भयाण रोग तर दिलाच सोबत जेव्हा पावसाची गरज असते तेव्हा कधीच पडत नाही पण नको तेव्हा मालाची नुकसान करतो. असच तर झाल आहे आपल्या राजाच्या बाबतीत या कोरोनाच्या काळात बदललेल्या ऋतूचक्राने शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन संकट एकाच वेळी येतात तेव्हा “इकडे आड तर तिकडे विहीर” या अर्थाची म्हण वापरतात त्याच प्रकारे यावेळी मला एक म्हण आपल्या राजाच्या बाबतीत आठवते ” इकडे कोरोना तर तिकडे बदलले ऋतूचक्र” तस तर या कोरोना काळात सर्वच म्हणींचा अर्थ बदललेला आहे. हा एक गमतीशीर तेवढाच गंभीर विषय आहे. असो हा कोरोना लवकरच जाऊन पुन्हा नव्याने सर्व सुरळीत व्हायला पाहिजे. त्यातच आपला “शेतकरी राजा” सुखी होऊन त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा.
जाता जाता पुन्हा एकदा इंद्रजित भालेराव यांच्या कवितांच्या ओळी घेऊन हा लेख समाप्त करते. त्यांच्याच कवितेतील शेवटीच कडव शेतकरी राजाचे वर्णन त्यात त्याचे जिवन त्याची प्रामाणिकता सर्च दिसून येते
“पीठामागल्या घामाची
काय चव सांगु तुला
आम्ही काष्टाचंच खातो
जग करी हापाहाप!”

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत