कोरोनावर करू या मात

कोरोनावर करू या मात

२१ व्या शतकात जगाने सर्व तंत्रज्ञान विकसीत करूनही ,आज संपूर्ण जगात दहशत पसरली आहे ती जैविक विषाणू कोरोनाची. आपली छोटीसी चुक, रोगाला आमंत्रण ठरू नये म्हणून, प्रत्येक सुजाण नागरिकाने कोणत्या गोष्टीचे पालन करायचे, आपले कर्तव्य कसे पार पाडायचे, हे अगदी मार्मिक शब्दांत मांडले आहे

कोरोनावर करू या मात
देऊनी सरकारला साथ
तरुनी जाईल ही वेळ
सोस थोडी कळ…..।।१।।

प्रतिबंध हाची यांवर उपाय
नसे दुसरा कुठला पर्याय
कामी येईल तुझाच संयम
नाश करण्यास कोरोनाचा कायम ….।।२।।

तूच आहेस तुझ्या जीवनाचा रक्षक
नको होऊस इतरांचा भक्षक
दवडू नकोस ही संधी परोपकाराची
दे पावती तू सुजाण नागरिक असल्याची….।।३।।

न घेता हाती शस्त्र अन बाण
न जाता लढण्यांस रणांगणी
घरीच राहूनी कर कोरोनाला गारद
न होता देशासाठी शहिद….।।४।।

मित्रा,राहता तू विभक्त
थांबवशील तू कोरोनाचं होणं द्विगुणीत
नको करुस भ्रमण
रोखशील तू त्याचं संक्रमण….।।५।।

1036999 coronavirusdeadlyoutbreakandcoronavirusesinfluenzabackgroundasdangerousflustraincasesasapandemicmedicalhealthriskconceptwithdiseasecellsasa3drender. 819408

आहे साऱ्यांना खात्री
देईल भारत कोरोनाला कात्री
वास्तवात होईल पूर्ण ही अपेक्षा
उत्तीर्ण होता तू कोरोनाची परीक्षा…।।६।।

नाही मानत कोरोना धर्म जात-पात
त्याच्या लेखी सारे समान
कर कोरोनाला चित,
जोडूनी दोन्ही हात, जो मिळवी त्याच्याशी हात….।।७।।

आज पैसा अडका आहे निकामी
फक्त येईल प्रतिकारशक्ती कामी
मनाला ठेव तू सशक्त
तेव्हा लाभेल आरोग्य स्वस्थ….।।८।।

हास्पिटले आज झाली मंदिरं
भेटी देव रूपी पोलीस, डॉक्टर
व्यर्थ न जाई त्यांची सेवा
करता तू तुझं कर्तव्य….।।९।।

सौ. निलिमा वसंत वारके
९९६७५८५७९३

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत