कोरोनाचा बाप कोण? समजणार 90 दिवसांत!

कोरोनाचा बाप कोण? समजणार 90 दिवसांत!

कोरोना महामारी मुळे आज संपूर्ण जगभरातील देशांमध्ये प्रेत जाळण्यासाठी स्मशान भूमी कमी पडत आहे. अशात कोरोनाचा कहर थांबता थांबत नाहीये.
कोरोना मुळे अनेक क्षेत्रांचे नुकसान झालेले आहे.

सुरवातीला पहिल्या कोरोनाच्या लाटेमध्ये अनेक देशांनी कोरोना व्हायरसचा उगम चीन मधील वुहान या शहरातून  झाल्याच म्हटल होत.

परंतु या संदर्भात कुणाकडेच ठोस पुरावे उपलब्ध नव्हते.

WHO ने देखील याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते देखील यात असक्षम झाल्याच पहायला मिळालं.

तर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरीकी गुप्तचर यंत्रणांना 90 दिवसांची म्हणजेच 3 महिन्यांची मुदत देत कोरोनाचा उगम कुठून झाला याचा शोध घेण्याचे नि्देश दिलेले आहेत.

जो बायडेन यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे 90 दिवसांत कोरोनाचा बाप कोण हे समजणार का याकडेच आता संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.
  • रुचिका जाधव
author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत