कोजागिरी पौर्णिमेची रात्र

WhatsApp Image 2021 10 19 at 6.00.36 PM

संकष्टी चतुर्थीला आपण जसे उपवास सोडण्यासाठी चंद्रोदयाची वेळ बघतो. चंद्राची प्रतीक्षा करतो, पण खरा चंद्रोत्सव फुलतो, रंगतो, भावतो, स्मरतो तो कोजागिरी पौर्णिमेला. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. पुराना नुसार शरद पौर्णिमेच्या रात्री भगवती महालक्ष्मी पृथ्वीवर कोण कोण जागे आहे हे पाहण्यासाठी भ्रमण करते. आणि जे लोक जागे असतात त्यांना महालक्ष्मी कल्यान करते, धनधान्य आणि समृद्धी प्रधान करते असे मानले जाते.

पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वछ, निरभ्र व सुंदर दिसते. या नीरभ्र आकाशाचा आनंद घेता यावा व त्याचे स्वागत करावे म्हणून कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला शरद ऋतू च्या पौर्णिमेच्या स्वछ चांदण्यात दूध आटवून चंद्राला नैवेद्य दिला जातो आणि नंतर ते दूध प्रसाद म्हणून ग्रहणही केले जाते. सद्या या दिवशी सगळीकडे गरबा, दांडिया देखील खेळला जातो आणि त्यानंतर सगळे एकत्र येऊन हे दूध प्राशन करतात. अशी ही कोजागिरी पौर्णिमा सगळे एकत्र येऊन साजरी करतात गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे हा सण देखील घरात राहूनच साजरा केला गेला पण सध्याची महामारीची स्थिती पाहता हळूहळू हे सण कमी प्रमाणात एकत्र येऊन साजरे केले जात आहेत.

तन्वी तिरपळे
सलाम बॉम्बे फाउंडेशन
मीडिया अकादमी.
विद्या विकास मंडळ विद्यालय

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत