केस गळण्याचे ‘हे’ आहेत कारणे आणि उपाय

केस गळण्याचे ‘हे’ आहेत कारणे आणि उपाय

सध्याच्या ताणतणावाच्या जीवनात स्त्रियांसह पुरुषांची देखील केस गळण्याबाबत तक्रार असते. केमिकलयुक्त प्रोडक्टस, प्रदूषण, योग्य निगा न राखणे, कोंडा यांसारख्या अनेक कारणांमुळे केस पातळ होतात आणि गळतात. आता आपण जाणून घेऊया केस गळण्याची कारणे आणि उपाय.

केस गळण्याची कारणे-

१) हार्मोन्सच्या असंतुलनामुळे स्त्री आणि पुरुषांचे केस गळत असतात.

२) प्रसूतीमुळे आणि मॅनेपोजनंतर देखील स्त्रियांचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतात.

३) थायरॉईडची समस्या तसेच मानसिक ताणतणाव यांमुळे देखील केस गळतात.

४) व्हिटॅमिन- D, व्हिटॅमिन- E, व्हिटॅमिन- B १२, झीन्क, आयर्न यांसारख्या कमतरतेमुळे केस गळतात.

५) प्रदूषण, मानसिक तणाव, कोंडा अशा छोट्या छोट्या कारणांमुळे देखील केस गळण्याची समस्या उदभवतात.

६) इतर आजारांमुळे गोळ्या- औषधें, आणि इतर केमिकलयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे देखील केस गळतात.

hair fall rescue remedies
hairfall
AR 180809808.jpgNCS modifiedexif
how to reduce hairfall

केस गळण्याचे उपाय-

१) कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते. एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढून रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवल्याने केस गळती थांबण्यास मदत होते.

२) भिजवलेल्या मेथीच्या बिया मिक्सरमधून बारीक करून ती पेस्ट केसांना लावून एका तासानंतर धुवून टाका.

३) जास्वदांची फुले बारीक करून खोबऱ्याच्या तेलात घालून हे तेल काही तासांसाठी केसांना लावावे आणि नंतर केस धुवून टाकावे.

४) केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद ,प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते. नाराळाचे तेल गरम करून घ्या व केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा.
तासाभराने केस धुऊन टाका किंवा खोबरं किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा. रात्रभर ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका.

५) केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी ‘आवळा’ नक्कीच फायदेशीर ठरतो , त्यातील व्हिटामिन सी व एन्टीऑक्सिडन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवते. आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या. केस कोमट पाण्याने धुऊन टाका.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत