केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी किवीचे हेयर मास्क वापरा

केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी किवीचे हेयर मास्क वापरा

किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आढळते जे केसांची गळती कमी करण्यासह केसांना मजबूती देतात. या मध्ये मॅग्नेशियम,झिंक,फास्फोरस,सारखे खनिज घटक रक्त प्रवाह सुरळीत करतात या मुळे
केसांची वाढ होते. किवींचा नियमित वापर केल्याने कोंडा आणि खाज होण्यापासून आराम मिळतो.

किवी मास्क कसे वापरावे
किवीचा गर नारळाच्या तेलात मिसळून केसांना लावल्याने फायदा होतो.
कसं वापरावे –
* सर्वप्रथम किवी सोलून त्याचा गर काढून घ्या.
* किवी मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा.
* ही पेस्ट वाटीत काढून त्यात नारळाचे तेल मिसळा.
* हे हेयर मास्क वापरण्यासाठी तयार आहे.
* केसांचे दोन भाग करा.* केसांच्या स्कॅल्प पासून टोकांपर्यंत लावा.
* केसांना शॉवर कॅपने झाकून घ्या.
* अर्धा तास केसांना हेयर मास्क लावून ठेवा.
* अर्ध्या तासानंतर केसांना सौम्य शॅम्पूने धुवून घ्या.
* या हेयर मास्क चा वापर आठवड्यातून किमान एकदा केल्याने केसांची चमक वाढते.

फायदे-
* या मुळे केसांची गळती कमी होते.
* केसांची चमक वाढते.
* डोक्यातील कोंडा कमी होतो.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत