केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेच्या नावाखाली महाघोटाळा

केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेच्या नावाखाली महाघोटाळा

जिल्हा प्रतिनिधी जालना-तालुका प्रतिनिधी परतूर- मंठा/…
केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेच्या नावाखाली महाघोटाळा,राष्ट्रीयीकृत बँका शेतकरी खातेदाराच्या खात्यातून परस्पर अटल पेन्शन योजना विमा हप्ता कपात केलेले पैसे परत द्या प्रकाश(बापु)सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना, जालना जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेच्या नावाखाली महाघोटाळा करून करोडो रुपयांचा शेतकरी खातेदारांना राष्ट्रीयीकृत बँकेने दिवसाढवळ्या चुना लावला त्या शेतकऱ्यांचे परस्पर कपात केलेले पैसे तत्काळ परत देण्याची कारवाई करावी,

WhatsApp Image 2021 05 17 at 3.01.16 PM 1

अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्यमंत्री मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले सोळंके पुढे म्हणाले की, जालना जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँक खातेदाराच्या खात्यातुन केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेच्या नावाखाली परस्पर विमा हप्ता कपात करीत आहेत,

WhatsApp Image 2021 05 17 at 3.01.16 PM

प्रत्येक व्यक्तीचे अनेक राष्ट्रीय कृत बँकेच्या बँकेत अकाऊंट असते त्या अकाऊंटमधुन अटल पेन्शन योजनेच्या नावाखाली परस्पर विम्याच्या हप्त्याचे पैसे कपात होत असल्यामुळे खातेदारांचे लुटालुट चालू आहे, एका राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये अटल पेन्शन योजनेचा विम्याचा हप्ता कपात केल्यानंतर इतर राष्ट्रीयकृत बँकेने अटल पेन्शन योजनेचा विम्याचा हप्ता का करावा किंबहुना परस्पर पैसे ट्रान्सफर का करावे,

WhatsApp Image 2021 05 17 at 3.01.15 PM 1

कारण एका राष्ट्रीयीकृत बँकेत विम्याचे पैसे कपात झाल्यानंतर दुसऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेने पैसे कपात करू नये कारण एकच बँक, अटल पेन्शन योजनेच्या विम्याची जबाबदारी स्वीकारून विमा पॉलिसी देणार आहे, मग एक बँक जर विमा पॉलिसी देत नसतील तर मग इतर बँकेने खातेदारांचे पैसे परस्पर कापत करावेत, जालना जिल्ह्यातील अनेक खास करून शेतकरी खातेदारांचे राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेत खाते आहेत,

WhatsApp Image 2021 05 17 at 3.01.14 PM 1

अनेक बँकेमध्ये अनेक लोकांचे आर्थिक व्यवहारासाठी खाते खोलले असतात परंतु याचा दुरुपयोग करीत बँक संबंधित खातेदाराच्या खात्यातून केंद्र शासनाच्या अटल पेन्शन योजनेच्या विम्याच्या नावाखाली पैसे कोट्यावधी रुपये परस्पर कपात करतात असे करणे बंधनकारक आहे, कारण एकच बँक केंद्र सरकारचे योजना अटल पेन्शन योजनेच्या विमा कपात करू शकते, कारण तीच बँक अटल पेन्शन योजना लाभ संबंधित शेतकरी खातेदारांना देऊ शकत म्हणून,इतर बँकेला अधिकार नाही, जालना जिल्ह्यातील केंद्र सरकारचे योजना अटल पेन्शन योजना चालू झाली तेव्हापासून आज पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर अटल पेन्शन योजना विमा परस्पर कपात करून जनतेची फार मोठी फसवणूक झालेले आहे, अटल पेन्शन योजनेअंतर्गत झाल्याला महाघोटाळा थांबविण्यासाठी जालना जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन तत्काळ ज्या बँके ना अटल पेन्शन योजने नावाखाली विमा का कपात केला करण्याचा अधिकार आहे का, संबंधित शेतकऱ्याच्या खात्यातून अटल पेन्शन योजनेच्या नावाखाली खातेदाराचे आज पर्यंत कपात केलेले पैसे परत खात्यावर जमा करावे,तत्काळ कारवाई होईल ही अपेक्षा,
जालना जिल्ह्यातील आज पर्यंत राष्ट्रीयकृत बँकेने अटल पेन्शन योजनेच्या विम्याच्या नाव नावाखाली कोट्यावधी रुपयांचा महाघोटाळा करून शेतकरी खातेदारांना चुना लावला, एक अधिकृत राष्ट्रीयीकृत बँक वगळता,आशा जालना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेला आदेश देऊन संबंधित खातेदाराचे अटल पेन्शन योजना विम्याच्या नावाखाली कपात केलेले पैसे परत करण्या बाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती,
योग्य वेळेत योग्य ती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना,मनसे स्टाईल आंदोलन करेल असा सजड इशारा हे मनसे जिल्हाध्यक्ष सोळंके यांनी दिली…

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत