‘कूल’ हिवाळ्यातील ‘कूल’ फॅशन

‘कूल’ हिवाळ्यातील ‘कूल’ फॅशन

महिलाच आपल्या सौंदर्याकडे विशेष लक्ष देतात असे नाही, तर पुरुषही आपल्या सौंदर्याविषयी अधिक सजग झाले आहेत. फक्त ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन आपलं सौदर्य खुलू शकत नाही, तर त्यासाठी तुमचा पोशाखही महत्त्त्वाची भूमिका निभावत असतो. मधुरिमाच्या वाचकांसाठी अशाच फॅशन टिप्स घेऊन येत आहेत फॅशन एक्सपर्ट तेजश्री गायकवाड.

चला अशा प्रकारे आपलं नववर्षात आगमन झालं आहे. नववर्षाचं उत्साहात स्वागत झालंच असेल आणि आता आपली घडी परत रुळावर येऊ घातली आहे. नववर्षात आपण बरंच काही नवीन करतो. तसंच आपल्या वॉर्डरोबमध्येही नवनवीन गोष्टीचा समावेश होतो. जानेवारी महिना हा थंडीचा ऋतू. अर्थातच या ऋतूमध्ये आपल्याला आपल्या कपाटामध्ये गरम कपडे अॅड करावेच लागतात. हिवाळ्यासारख्या ऋतूमध्येही  कपड्यांचे  खूप पर्याय असतात. आशयच काही ट्रेंडिंग पर्यायासोबत यंदाच्या या कूल महिन्यामध्ये कोणती ‘कूल’ फॅशन आपल्याल

रंग –

फॅशन मधला महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे कलर, रंग. या रंगामुळे अनेकदा फॅशन फसते किंवा खूपच उठावदार होते. दरवर्षी पॅनटोन ही कलर कंपनी ‘कलर ऑफ द इअर’ जाहीर करते आणि तो रंग सगळीकडे फॉलो केला जातो. यंदाचा रंग आहे ‘क्लॉसिक ब्लू’ अर्थात निळ्या रंगाची गडद छटा. भावनिक, नेहमीच शांत असा रंग म्हणजे निळा रंग. गेल्या काही वर्षापासून पेस्टल रंगाच राज्य होत. परंतु क्लॉसिक ब्लू हा रंगांच्या फॅशनमध्ये आलेला बदल दर्शवतो. त्यामुळे यंदा कपड्यामध्ये जास्तीत जास्त गडद निळा  रंगाच्या छटा वापरल्या जाणार आहेत. निळ्या रंगासोबत फिकट ब्राऊन, गडद हिरवा, लाल आणि राखाडी  रंगाच्या गडद ते फिकट सगळ्याच शेड यंदा ट्रेन्ड मध्ये असणार आहेत. 

अपर गारमेंट –

रोजचं सेम स्वेटर घालून बाकीच्या कपड्यांची शोभा जाते. त्यामुळे स्वेटर मध्येसुद्धा कधी हाफ कधी फुल तर कधी कधी स्लिव्हलेस बाह्यांचे स्वेटर वापरावे. पूर्वी स्वेटर्स ज्या पॅटर्नमध्ये मिळायचे त्यात उपयुक्तता होती पण स्टाइल मात्र नव्हती. परंतु आता स्ट्रेप्स, बॉर्डर किंवा तत्सम डिझाइन्स असलेले चार-पाच रंगात विणलेले स्वेटर्स कम पुल ओव्हर, झिपर जीन्सवर घालणं हा तर सध्या फण्डा बनला आहे. स्वेटर शिवाय यंदा  स्वेट शर्ट जास्त ट्रंेडीग मध्ये दिसणार आहेत. स्वेट शर्ट मध्ये आतून किंवा वरून अजून कोणतेही कपडे घालायची गरज भासत नाही. थंडीच्या रक्षणासोबतच हा शर्ट फॅशनेबल लूक पण देतो. पोलो नेक , व्ही शेप, शॉल कॉलर, क्रू नेक्लाइन अशा  स्वेट शर्टच्या नेकलाईन मध्ये अनेक प्रकारची व्हरायटी यंदा बाजारात आलेले आहेत. काही स्वेट शर्टलाच हुडीसुद्धा अटॅच असते.  थोड्याफार फरकाने स्वेट शर्ट सारखीच लूक देणारी हुडी ही अनेक वर्षापासून हिवाळी  फॅशनमध्ये प्रसिद्ध आहे. स्वेटर, हुडी, स्वेट शर्ट सोबतच डेनिम जॅकेट, लेदर जॅकेट्स सुद्धा ट्रेंड मध्ये असणार आहेत. फक्त या जॅकेट्स मध्ये यंदा श्रगची भरती झाली आहे. मागील  काही काळापासून श्रगची फॅशन ही फक्त मुलींची होती. पण काही वर्षापासून  ती  फॅशन मुलांमध्ये जास्त दिसत आहे. लेदर जॅकेटस् हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. लेदर जॅकेट आणि डेनिम जीन्स हा लूक कधीही चुकू शकत नाही. थंडीत पार्टीला जायचं असेल आणि तेही वन पिस घालून तर त्यासाठी डेनिमचा पर्याय योग्य ठरेल.  वनपीसवर तुम्ही डेनिम जॅकेट घालू शकता. फक्त निळ्या रंगाचेच डेनिम जॅकेट मिळतात अस नाही. आता गुलाबी, पांढरा, काळा अश्या अनेक रंगामध्ये हे डेनिम जॅकेट उपलब्ध आहेत. तुमच्यासाठी डेनिम वनपीस किंवा डेनिमची डंगरी हाही पार्टी लूकसाठी उत्तम पर्याय आहे.

बॉटम्स –

बारा महिने ट्रेंड मध्ये असणारी डेनिम जीन्स यंदाही ट्रेंड मध्ये असणारच आहे आणि थंडी मध्ये या जीन्सचा चांगलाच फायदा होतो. ९० च्या दशकातील चागल्या फिट बसणाऱ्या ‘अनवॉशड जीन्स’ यंदा परत ट्रेंड मध्ये आल्या  आहेत. गडद निळा, ग्रे आणि काळ्या रंगात या जीन्स जास्त दिसतील. ९० सोबतच ८० च्या दशकातील स्टाईलच्या हाय वेस्ट , फेडेड ब्लू कलर च्या जीन्ससुद्धा ट्रेंड मध्ये आहेत.  शिवाय क्रॉप कींवा फोल्डेड जीन्स, स्कीनी जीन्स, स्लिम फिट जीन्स, रिपट जीन्स हे जीन्सचे प्रकार सुद्धा ट्रेंड मध्ये आहेत. जीन्स व्यतिरिक्त स्लिम फिट पॅन्ट,  कारगो पॅन्ट , स्वेट पॅन्ट या सुद्धा ट्रेंड मध्ये असणार आहेत. प्लेन रंगमधल्या या पॅन्टस्   कोणत्याही शर्ट, टी-शर्ट, स्वेट शर्ट, हुडी खाली  छान दिसतात. जीन्स व्यतिरिक्त हॉट योगा पॅन्टसही उपयुक्त ठरतील. वेगवेगळ्या रंगातील या पॅन्ट अगदी लेगिंगच काम करतील. त्यामुळे थंडीमध्येही तुम्ही सहज हॉट योग पॅन्ट आणि कुर्ती, टॉप हा लूक कॅरी करू शकता.

स्कार्फ –

स्कार्फमुळे कोणत्याही कपड्याला हटके लूक येतो. थंडीमध्ये या स्कार्फचा वापर नीट केल्या थंडी पासून रक्षणही होईल आणि फॅशनेबल हटके लूकसुद्धा मिळेल. थंडीत कुठल्याही कपड्यांवर जसे की  वेस्टर्न किंवा एथनिक फ्युजन वेगवेगळ्या रंगांचे, प्रिंट असलेले स्टोल्स वापरता येतील. लोकरीचे विणलेले स्कार्प, कॉटन कपड्याचे, फंकी, चेक्स प्रिंट असलेले स्कार्प, प्लेन फिकट रंगाचे स्कार्प यंदा ट्रेंड मध्ये आहेत. स्कार्फची स्टाइल ठरवताना आऊटफिटची फॅशन बघून स्कार्फ स्टाइल करावा.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत