कुस्तीपटू सुशील कुमार याला 6 दिवसांची पोलीस कोठडी, सागर राणा याची हत्या केल्याचा आरोप

कुस्तीपटू सुशील कुमार याला 6 दिवसांची पोलीस कोठडी, सागर राणा याची हत्या केल्याचा आरोप

कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येच्या आरोपाखाली ऑलम्पिंक मेडल विजेता सुशील कुमार (Shushil Kumar) याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कुस्तीपटू सागर राणा  याच्या हत्येच्या आरोपाखाली ऑलम्पिंक मेडल विजेता सुशील कुमार (Shushil Kumar) याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वर्ल्ड रेसलिंग डे च्या दिवशी रविवारी दिल्लीतील पोलिसांनी सुशील कुमार याला दिल्लीतील मुंडका येथून ताब्यात घेतले आहे. कुस्तीपटू सुशील कुमार गेल्या 18 दिवसांपासून पोलिसांपासून सुटका व्हावी यासाठी लपून बसला होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुद्धा करण्यात आली. तसेच त्याच्यावर 1 लाखांचे बक्षीस सुद्धा लावण्यात आले होते.

सुशील कुमार याला अटक केल्यानंर दिल्ली पोलिसांनी त्याला रोहिणी कोर्टात हजर केले. तेथे पोलिसांनी सुशील कुमार याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी असे कोर्टासमोर अपील केले. कोर्टाने दोन्ही पक्षाचे मत ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता. मात्र थोड्याच वेळात निर्णय सुनावत सुशील कुमार याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या केल्यानंतर सुशील कुमार याने पळ काढला. मात्र आज अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. स्पेशल सीपी-स्पेशल सेल नीरज ठाकुर यांनी कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजय याला अटक करण्यात आल्याची पुष्टी केली.

पोलिसांनी सुशील कुमार याच्यावर 1 लाखांचे बक्षीस लावले होते. तर अजय याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस होते. सुशील कुमार आणि सागर धनखड यांच्यामध्ये मतभेद असल्याची बाब समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, सागर हा सुशील कुमार याच्या पत्नीच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. तो छत्रसाल स्टेडिअममध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेत होता. लहान वाद ऐवढा टोकाला पोहचला की सागर याची हत्या करण्यात आली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमार याने चौकशीत असे सांगितले की, त्याला माहिती नव्हते हे प्रकरण ऐवढे वाढले जाईल. त्याने म्हटले, मित्रांनी संतापात येत सागर याला मारहाण केली. परंतु त्याचा मृत्यू होईल हे कोणालाच वाटले नाही.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत