का ? करतात “कारगिल विजय दिवस” साजरा…

का ? करतात “कारगिल विजय दिवस” साजरा…

Why do Kargil celebrate Victory Day

kargil vijay diwas : देशात आज 22 वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. या दिनानिमित्त राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांनी शहीद जवानांना अभिवादन केलं आहे. 1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यात भारताने विजय मिळवला होता.

कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वाची घटना आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं आणि विजय मिळवला. कारगिल युद्धात भारताने मिळवलेला विजय ही पाकिस्तानची भळभळती जखम आहे. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून 26 जुलैला ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो

Kargil War 1

विजय दिन का साजरा केला जातो?

1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यात भारताने विजय मिळवला होता. त्या युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवस दरवर्षी कारगिलच्या द्रास येथील युद्ध स्मारकात साजरा केला जातो. 1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारताच्या या शिखरांवर घुसखोरी केली होती. 14 ते 18 हजार फूट उंचीवर असलेल्या या शिखरावरून भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं. या युद्धामध्ये आपले 500 सैनिक शहीद झाले होते. हे युद्ध लष्करी इतिहासामध्ये एक अतिशय कठीण आणि धोकादायक युद्ध म्हणून ओळखले जाते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत