कार्यकर्त्यांच्या घरी जेवायला जाणार मनसे प्रमुख राज ठाकरे

कार्यकर्त्यांच्या घरी जेवायला जाणार मनसे प्रमुख राज ठाकरे

MNS chief Raj Thackeray will go to the party workers' house for dinner

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला गेल्या चार-पाच वर्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठी खुद्द पक्ष प्रमुख राज ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि उमेद जागविण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरु केल्या आहेत. पुणे दौऱ्यावेळी आलेल्या राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट ‘घरी जेवायला’ येणार असल्याचे सांगितले .परंतु चांगले काम करुन दाखविण्याची अट मात्र घालायला ते विसरले नाहीत. त्यांनी काही पदाधिकाऱ्यांशी समोरासमोर चर्चा देखील केली. त्यांच्या या आवाहनाची चर्चा मनसे कार्यकर्त्यांमध्ये होती.

621178 raj thackeray dna image

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मनसेच्या नव्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आलेल्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याला पुन्हा आणखी तीन दिवस दिले आहेत. या तीन दिवसीय दौ-यात विधानसभानिहाय बैठका घेतल्या जात आहेत. सत्रात वडगावशेरी आणि कोथरूड विधानसभा मतदार संघातील आणि दुपारच्या सत्रात कोथरूड आणि खडकवासला विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांशी संवाद साधला.

यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष वसंत मोरे, शहर महिला अध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे, बाळा शेडगे, पालिकेतील गटनेते साईनाथ बाबर यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य, महीला आघाडीच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. ठाकरे मंगळवारी हडपसर, कॅन्टोमेंट, कसबा आणि पर्वती मतदार संघातील पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत