काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राहुल गांधी झाले भावूक

काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राहुल गांधी झाले भावूक

काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘माझा मित्र राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्याने मला फार वाईट वाटलं. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना मूर्त रूप देणारे नेते होते. हे आपल्या सर्वांचे एक मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या सदिच्छा.’

कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज सकाळी निधन झाले. कोरोना संसर्गामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 22 एप्रिल रोजी त्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. तेव्हापासून त्याच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. ते व्हेंटिलेटरवर होते. कोरोना संसर्ग झाल्याने राजीव सातव यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली होती. 

राजीव सातव हे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जवळचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर, कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आहे. गेल्या महिन्यात संसर्ग झाल्यानंतर राजीव सातव यांनी सांगितलं होतं की, सौम्य लक्षणं दिसल्यानंतर कोरोना चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सातव यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना आपली कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले होते.

राजीव सातव हे महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य होते. या अगोदर ते 2014 मध्ये महाराष्ट्रातील हिंगोलीचे लोकसभा मतदारसंघाचे खासदारही होते. सध्या सातवा हे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव आणि गुजरात कॉंग्रेसचे प्रभारी होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत