कवयित्री प्रज्ञा पंडित ‘साहित्य सेवा’ पुरस्काराने सन्मानित.

0528FD4C 475A 4CF7 9158 601742CE108A

काव्य ,नाट्य , लेखन ,निवेदन इत्यादी अनेक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या कवयित्री – लेखिका – समिक्षिका प्रज्ञा मनिष पंडित यांना अत्यन्त मानाच्या ‘साहित्य संगम प्रतिष्ठान’ तर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्य सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
निवृत्त मॅजिस्ट्रेट जी.ए.पाटील यांच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात अडव्हॉकेट शिवाजी पाटील यांच्या हस्ते ठाण्याच्या मराठी ग्रँथ संग्रहालयात प्रज्ञा मनिष पंडित यांना ‘साहित्य गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘व्यक्त- अव्यक्त ‘ या काव्यसंग्रहाद्वारे साहित्यक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या प्रज्ञा पंडित यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे रसिकांनी जोरदार स्वागत केले. विश्वकोश च्या माजी अध्यक्षा लेखिका डॉ.विजया वाड यांनी या काव्यसंग्रहावर आपल्या पसंतीची मोहोर उमटविली होती. प्रज्ञा पंडित यांचे लेखन म्हणजे बावनकशी सोने असल्याचे गौरवोद्गार डॉ. विजया वाड यांनी काढले होते.
प्रज्ञाक्षरे ,काव्यलिपी , बाबा इंग्रजी माझ्या खिशात , मुलाखतीची गुरुकिल्ली , भारतीय खाद्यसंस्कृती आणि विविध विषयांवरील शोधनिबंध इत्यादी साहित्य संपदा प्रज्ञा पंडित यांच्या नावावर आहेत. ‘ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन’च्या त्या अध्यक्षा असून नवोदित कवी – लेखकांना एकत्र करून व्हर्चुअल प्लॅटफॉर्मवर अनेक उपक्रम त्या करीत असतात. रिलायन्स सारख्या जागतिक दर्जाच्या ब्रँडमध्ये मार्केटिंग क्षेत्रात त्यांनी अनेक युवक – युवतींना मार्गदर्शन करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. तेजस्वी अँकॅडमीतर्फे त्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात.
ठाण्याच्या जोशी- बेडेकर कला- वाणिज्य महाविद्यालयातुन त्या अर्थशास्त्र या विषयात एम.ए. मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. एम.बी.ए.चे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून काही वर्षे त्यांनी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती जावी म्हणून विविध राज्यातील महानगरपालिकांच्या सहकार्याने शाळांमध्ये ‘इंग्रजी तुमच्या खिशात’ हा अभिनव उपक्रम त्या राबविणार आहेत. लेखिका प्रज्ञा पंडित विविध विषयांवर लेखन करीत असतात. अनेक नव्या-जुन्या पुस्तकांवर त्यांनी लिहिलेली समीक्षणे वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहेत.सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ , डॉ. विजया वाड यांच्या पुस्तकावरील समीक्षणे विशेष गाजलेली आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये त्यांचा हातखंडा असून अनेक संस्थांच्या कार्यक्रम नियोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

शुभम पेडामकर

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत