करोनावर मात केल्यावर करा हे सोपे व्यायाम

करोनावर मात केल्यावर करा हे सोपे व्यायाम

Do these simple exercises after overcoming Corona

कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमितपणे आरोग्यदायी आहारासोबतच सोपे व्यायाम देखील केले पाहिजे. कोरोनावर मात करून बरे होऊन घरी आलेल्या लोकांची आयुष्य पुन्हा पूर्वीप्रमाणे जगण्याची खरी लढाई सुरु होते. पुन्हा नव्याने आल्हाददायक आणि आशावादी जीवन सुरु करण्यासाठी शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे. योग्यवेळी औषधोपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर कोरोनाशी मात करत आतापर्यंत भारतात अनेक लोकांनी विजय मिळवला आहे. घरी आल्यानंतर जगण्याची नवी उमेद आणि जोश पूर्वीसारखा करण्यासाठी आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुदृढ असणे अत्यंत गरजेचे आहे.

positive thinking 4933330 1920

कोरोनावर मात घरी करून परतल्यानंतर करा हे सोपे व्यायाम-

व्यायामामुळे श्वास घेण्यास होणारा अडथळा कमी होऊन स्नायू मजबूत होण्यास मदत होते. तसेच मानसिक ताणही कमी होतो. योग्य पद्धतीने आणि नियमितपणे व्यायाम केल्याने आत्मविश्वास देखील वाढतो. रुग्णालयात ऑक्सिजनवरअसलेल्या रुग्णाने घरी परतल्यानंतर व्यायाम करताना आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला सोबत ठेवावे. व्यायाम करताना त्रास झाला तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

१) खांदे पुढे-मागे रोल करावेत. उभं राहून किंवा खुर्चीवर बसून डाव्या आणि उजव्या बाजूस थोडं वाकावं. पाय गुडघ्यात वाकवून उचलण्याचा प्रयत्न करावा. याला ‘वॉर्मअप’ असं म्हणतात.

२) ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या उपचारांनी कोरोनातून उपचार घेऊन आलेल्या रुग्णाला औषध, इंजेक्शन यांची शक्ती शरीरात अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात शरीरात ताकद राहत नाही. यासाठी जागच्या जागी चालण्याचा प्रयत्न करावा. बाहेर चालताना शक्यतो सपाट जमीन असेल त्याठिकाणी चालावे. रोज हळूहळू चालण्याचा वेग आणि अंतर वाढवावं.

३) कोरोना झाला या भीतीने माणूस मोठ्या प्रमाणात खचून जातो. अशावेळी सकारातमक राहणे अत्यंत आवश्यक असते. कोरोनातून बरे झाल्यावर आणि घरी परतल्यानंतर सकस, योग्य आणि पौष्टिक आहार घ्यावा. कायम ऍक्टिव्ह राहावं ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. लोकांशी बोलावं, मन शांत होण्यासाठी गाणी ऐकावीत, वाचन करावं. ब्रेन एक्सरसाइज करावेत जेणेकरून स्मृती वाढवण्यास मदत होईल.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत