“करू वनांचे संवर्धन… राखू पर्यावरणाचे संतुलन”

“करू वनांचे संवर्धन… राखू पर्यावरणाचे संतुलन”

पर्यावरण दिन तसेच शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा,ठाकुरपाडा (ग्रुप ग्राम-पंचायत पिंपरी) केंद्र-दहिसर, ता-कल्याण,जिल्हा- ठाणे या ठिकाणी नवसंकल्प सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य वतीने कोरोना काळातील सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून वृक्षारोपण करण्यात आले.

WhatsApp Image 2021 06 06 at 2.48.17 PM 1


शिवजयंती प्रसंगी नवसंकल्प सामाजिक संस्थेने जि.प.शाळा ठाकुरपाडा दत्तक घेतल्या कारणाने सदर वृक्षारोपण उपक्रम येथे राबवण्यात आला. वृक्षारोपणा सोबत वृक्षसंवर्धन देखील महत्वाचे असल्याकारणाने शाळेच्या मुख्याध्यापक श्री. जनार्धन देशमुख सरांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली.

WhatsApp Image 2021 06 06 at 2.48.17 PM


वृक्षारोपणानिमित्त ग्रामपंचायत सदस्या सौ. आशाताई भगत, जिल्हा प.शा.व्य.स.ठाकुरपाडा अध्यक्षा- सौ.पुजाताई सकपाळ, सदस्या- सौ. अंजली घाडी, ग्रामस्थ- सौ. स्मिता देशमुख, श्री. अशोक घाडी, श्री. शिवराम भगत, श्री. सुंदरराज नाडार. जी.प.शा. मुख्याध्यापक- श्री. जनार्धन देशमुख, शिक्षिका- सौ. ग्रीष्मा शिंदे तसेच नवसंकल्प सामाजिक संस्थचे अध्यक्ष- श्री. सागर मारुती जगताप, उपाध्यक्ष- कु. आकाश घाडगे, सरचिटणीस- कु. प्रणित अहिरेकर, सदस्य- प्रतीक खामकर, लक्ष्मण कोळेकर, युवराज देशमुख उपस्थित होते.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत