कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास होतोय का; एकदा क्लिक करून पाहाच;

कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास होतोय का; एकदा क्लिक करून पाहाच;

अनेकदा शरीरात कॅल्शियमची कमी या कारणाने कंबरदुखी, पाठदुखी असा काहीसा त्रास होतो. २५ ते ४५ या वयोगटात ही समस्या प्रामुख्याने आढळते.

*हे काही घरगुती उपाय आहेत, यावर नक्कीच उपयुक्त ठरु शकतात.

‌कंबरेच्या दुखण्यापासून सुटका मिळण्यासाठी मोहरीच्या तेलात लसणाच्या पाकळ्या उकळून ते तेल थंड करा व त्यानंतर त्याने चांगली मालिश करा.

‌आणखी एक सोपा उपाय म्हणजे, गरम पाण्यात मीठ मिसळून त्यात एक टॉवेल भिजवावा व त्याने कंबरेला शेक द्यावा. कंबरेला आराम मिळतो.

‌कंबरेच्या दुखण्यासाठी एका कढईत मीठ घेऊन ते चांगल गरम कराव व त्यानंतर एका सुती कापडात बांधून त्याची पोटली तयार करावी. व त्याने कंबरेला शेक द्यावा.

‌बसण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. विशेषता खुर्चीवर बसताना मान तर सरळ असावीच ती कुठेही झुकलेली नाही ना याची काळजी घ्यावी. याखेरीज कधीही अखडून बसू नये.

‌कधी कधी जुना एखादा लागलेला मार हा देखिल अचानक उफालून येतो आणि कंबर दुखू लागते. त्यामुळे याकजे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

‌तासन् तास एकाच जागेवर बसून काम करू नका. मध्ये मध्ये विश्रांती घ्या. तसेच खाण्यापिण्यावरही लक्ष द्या.

‌व्यायाम हा अत्यंत महत्तावाचा उपाय आहे. अनेक तास कमप्युटर समोर काम केल्याने कंबर दुखते, त्यामुळे नियमीत योग्य व्यायामाची सवय हा चांगला उपाय ठरेल.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत