ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक

BJP aggressive for OBC reservation

गेवराई प्रतिनिधी

WhatsApp Image 2021 06 26 at 1.32.31 PM 1

महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळेच संविधानाने दिलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे तरी रद्द झालेले ओबीसीचे राजकीय आरक्षण ओबीसी समाजाला मिळे पर्यंत भारतीय जनता पक्ष आपले आंदोलन थांबवणार नाही असा विश्वास आ. लक्ष्मण पवार यांनी चक्काजाम आंदोलनात बोलताना व्यक्त केला आहे
ओबीसींच्या राजकीय आरक्षण महाविकास आघाडी च्या नाकर्तेपणा मुळे रद्द झाले असल्याने या विरुध्द राज्यात भाजपाचाच्या वतीने रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आले असुन गेवराई बायपास वर हजारो भाजप समर्थकांनी आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतुत्वात चक्का जाम आदोलन करुन तिर्व भावना व्यक्त केल्या आहे

गेवराईत शनिवार ( 26 जून ) रोजी सकाळी भजापच्या वतीने सोलापुर -धुळे राष्ट्रीय महामार्गवरील बायपाय रस्त्यावर १ तास चक्का जाम आंदोलन केले या दरम्यान गाड्यांची रागं लागल़्या होत्या. शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे . त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे राजकिय नुकसान होणार आहे . तसेच भविष्यात राजकिय आरक्षणा प्रमाणे शैक्षणिक आणि नोकरी मधील आरक्षण देखील रद्द होण्याची शक्यता आहे . जिल्ह्यात ओबीसी समाज मोठया प्रमाणात आहे.ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागासवर्ग आयोग तयार करून लोकसंख्येनिहाय तपशीलवार आकडेवारी (इम्पिरिकल डाटा) तयार करायला सांगितली होती. पण, राज्याने अशी कोणतीही कारवाई १५ महिने केली नाही. त्यामुळेच हे आरक्षण गेले असल्याचा आरोप करत ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करुन मिळुन देवु असे चक्काजाम आदोलना दरम्यान बोलताना सांगितले आहे.या वेळी भाजप ता.प्रकाश सुरवसे अॅड सुरेश हात्ते, प्रा. पि.टी.चव्हाण जे. डी. शहा नगराध्यक्ष , जवंजाळ,उपाध्य्क्ष राजेंद्र राक्षसभुवनकर ,प.स.सभापती दिपक सुरवसे ,भाजपा जिल्हा.उपाध्य्क्ष दादासाहेब गिरी,नगरसेवक जान मोहमंद बागवान,राहुल खंडागडे, राजेद्र भंडारी, मधुकर वादे, ब्रम्हदेव धुरंधरे, शाम कुड, अमोल तिपाले, स़जय जाधव, सचिन मोठे अमोल मस्के गोपाल चव्हाण, ईश्वर पवार, आदि उपस्थितीत होते यावेळी शाम कुड, पि. टी. चव्हाण, जे. डी. शहा यांनी मार्गदर्शन केले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत