एस.एन.डी.टी महिला विद्यापीठात र.धों.कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न

048E88CD 5B43 4CCE A280 5557A8D82561

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे 23 वी र. धों. कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न झाली.

या व्याख्यानमालेचे पुष्प डॉ. अरुण गद्रे यांनी गुंफले.

ह्या व्याख्यानमालचे अध्यक्ष स्थान मा.एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या मा. कुलगुरु प्रा.डॉ. उज्ज्वला चक्रदेव ह्यांनी भुषविले.

या व्याख्यानमालेत डॉ. अरुण गद्रे यांनी प्रजनन आरोग्य आणि त्याचे व्यापारीकरण संदर्भातील प्रश्न आणि त्याचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम ह्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

र.धों. कर्वे व्याख्यानमालेच्या माध्यमातून पर्यावरण, लोकसंख्या शिक्षण तसेच सामाजिक प्रश्नांसंदर्भात विद्यार्थिनींमध्ये संवेदनशीलता तयार करणे हा मुख्य उद्दिष्ट आहे असे मत विभागाच्या प्रभारी संचालिका डॉ.रोहिणी सुधाकर यांनी व्यक्त केले.

78DC8865 6A75 45B4 AF66 AB0AFE06C518

ही व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण,प्रा. डॉ. भास्कर इग्वे ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.

शुभम पेडामकर

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत