एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ

An increase of Rs 25 in the price of LPG cylinder

मुंबई : दिवसा गणिक वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच आता पुन्हा एकदा विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरी वापरल्या जाणार्‍या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 834 रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये होती. दरम्यान, एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमती 10 रुपयांनी स्वस्त झाल्या होत्या, त्यानंतर मे-जूनमध्ये एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. दिल्लीव्यतिरिक्त आजपासून कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडर 861 रुपयांना विकण्यात येणार आहे. तर मुंबईत विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 834 रुपये असणार आहे. चेन्नईत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 850 रुपयांवर पोहोचल्या आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत