एका रात्रीत ७०० जीव वाचवणाऱ्या आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांचा राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सन्मान

एका रात्रीत ७०० जीव वाचवणाऱ्या आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांचा राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सन्मान

Dr. Ganesh Deshmukh honoured by Raje Foundation Workers

नवी मुंबई – एका रात्रीत ७०० जीव वाचवणारे खरेखुरे कोविड योद्धे आयुक्त गणेश देशमुख एकाच वेळी सुमारे दोन हजारांच्या घरात असलेली रुग्ण संख्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने ग्लोबल रुग्णालयात २२६ रुग्ण अतिदक्षता विभागात तर ५१० रुग्ण ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता दिसू लागली होती आणि यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूत्रे हाती घेतली.

ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, रायगडचे अतिरिक्त आयुक्त अमोल यादव यांनी अवघ्या काही तासातच रायगडमधून ऑक्सीजनचा साठा उपलब्ध केला अन्‌ एकाचवेळी ७०० जीव वाचले. ऑक्सिजन जरी रायगड जिल्ह्यातून आला असला तरी खऱ्या अर्थाने या सातशे जणांसाठी ‘प्राणवायू’ ठरले ते एकनाथ शिंदे अन गणेश देशमुख असे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सांगतात. अशा या कोविड योध्याचा राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, समाजसेवक डी. डी. गायकवाड, पनवेल तालुकाध्यक्ष अमित पंडित, ओमकार महाडिक, लखबिर सिंग आदी उपस्थित होते. यावेळी पनवेल महापालिका आयुक्तपदी डॉ. गणेश देशमुख यांची पुन्हा नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत