एका आईचा चेहरा, ज्यानं महाराष्ट्राचं काळीज पाणी पाणी झाल. ..

एका आईचा चेहरा, ज्यानं महाराष्ट्राचं काळीज पाणी पाणी झाल. ..
WhatsApp Image 2021 01 09 at 3.57.14 PM

भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात मध्यरात्री लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे.

या दुर्घटनेत अधिकाधिक बालिकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे भंडाऱ्याच्या आगीनंही ‘लक्ष्मी’लाच गाठल्याचं पाहायला मिळत आहे.
या दुर्घटनेत भंडाऱ्यातील उरसालामध्ये राहणाऱ्या सुकेशनी धर्मपाल आगरे या आईने आपली अवघ्या 12 दिवसांची चिमुकली गमावली आहे.

सुकेशनी यांच्या चिमुकलीसह आणखी 6 मुली आणि 3 मुलांचा या दुर्घटनेत बळी गेला आहे.या नवजात बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?, असा प्रश्न चिमुकल्यांचे पालक विचारत आहेत.

सुकेशनी यांनी देखील आपल्या चिमुकल्या लेकीच्या आठवणीत हंबरडा फोडला आहे. सुकेशनी यांच्यासह इतर बाळाच्या मातांची देखील अशीच अवस्था झाली आहे.
आमच्या बाळांना एकदा शेवटचं भेटू द्या, असं म्हणत या पालकांनी आपल्या चिमुकल्यांच्या आठवणींत हंबरडा फोडला आहे…

या लागलेल्या आगीमुळे मृत्युमुखी पडलेल्या त्या सर्व निष्पाप बालकांना द महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत