मी आणि माझा एकांत

मी आणि माझा एकांत

आज पर्यंत नाही वेळ दिला स्वत : ला वाटले आज गाठुया स्वतःला चांदणी अशी रात्र आज जाऊया वाटल एकांत . मनाला लागलेला कवितेचा छंद आणि मनाला बेधुंद करणारा आनंद..तेव्हा हातातून निसटलेले शब्द … सहसा मी असणारा शांत … मला आवडतो मी आणि माझा एकांत … एकांतात तरी कुठे एकटे असतो विचारांचा पसारा सोबत सोडत नसतो . ना कोणाशी भांडत असतो …. कधी हवा हवासा वाटतो तर तर कधी ईतका छळतो की नकोसा वाटतो … फक्त स्वतःच्या मनाशी बोलत असतो कोण आपलं कोण परक याची जाणीव आठवण काढून थोडं हसतं असतो आणि थोडं रडत असतो पण मात्र कधी कोणाला सांगत करून देत असतो ….. नसतो .

lonely boy


एकांतात जाण्याचे कारणनेहमी स्वतःला वेळ देणे असतो … एकांतात मला माझीच सोबत , एकांतात ही आपलसं वाटणाऱ्या माणसाचा विचार परक्यांनला आपले केले होते शेवटी परक्यांनीच आपल्याला परके केले होते याची जाणीव सदैव करत असतो , स्वत : च्या मनाशी बोलत असतो .. करून देत असतो ….. त्या एकांतात कविता लिहायला आवडतं ….. आणि त्या कवितेतच मन मोकळ करायला आवडत … कोणाचाही आवाज नको अन् क्रोध नको असं वाटतंय , प्रेम नको अन आस नको , स्वत : साठी जगावस वाटतय , फक्त एकांत राहवसं वाटतय ….. शांत बसुनी मनातल्या शंका घालवाव्याश्या वाटतयं ….. विचारांच्या वादळांना थांबवावस वाटतयं ….. असतो हा एकांत मग मन का करतो अशांत …… ?

                                   विनायक शेरेकर
author

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत