एकल महिला संघटनेने केले दारूचे गुत्थे बंद

एकल महिला संघटनेने केले दारूचे गुत्थे बंद

wine shops permanently cloesd by ekal mahila sanghtana

नवी मुंबई – कोरोची एकल महिला संघटना ही प्रत्येक वेळी नव्या धाटणीचे काम करून बदलाच्या नव्या संकल्पना आपल्या समोर आणतात. त्यांच्या या कामाची उमेद म्हणजे त्या चर्चा करण्यात जास्त वेळ दवडत नाही, तर समोर आलेल्या प्रश्नांवर तडक काम करायला घेतात. तुळजापूर तालुक्यातील शिर्गापुर गावातील दारू विक्रीमुळे होणारे दुष्परिणाम यावर मीटिंग मध्ये चर्चा झाली आणि तडक त्याच दिवशी त्यावर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवून गावातील दारूचे गुत्थे यांवर छापा टाकून ते बंद करण्यात आले.

कोव्हिडच्या पार्श्वभूीवर देखील काळजी घेऊन त्या काम करत आहेत. दर महिन्याला एकल महिला संघटनेच्या मीटिंग होतात, त्यात महिलांकडून आर्थिक, कौटुंबीक तसेच सामाजिक प्रश्नांवर, मुद्द्यांवर चर्चा होते. जूनच्या बैठीकीत दारूच्या आहारी जाऊन कौटुंबिक हिंसाचार आणि घराची आर्थिक कोलमडलेली घडी या मुद्द्यांवर महिलांनी सद्य परिस्थिती मांडली. त्यातील काही महिलानी त्यांचे नवरे दारूच्या नशेत मारहाण करून त्यांच्यावर कसे अत्याचार करतात , हे अनुभव देखील या मीटिंग मध्ये सगळ्यांसोबत शेअर केले. त्यात गेले काही वर्ष दारूमुळे अपघाताचे प्रमाण देखील उस्मानाबाद जिल्ह्यात प्रचंड वाढले आहे. या विषारी नशेने अनेक कुटुंबांना उध्वस्त केलं आहे, गावातील बऱ्याच महिलांनी या जाचाला कंटाळून घटस्फोट घेतले किंवा काही बायकांचे नवरे अपघातात दगावले.

याचे गांभीर्य लक्षात घेऊन एकल महिला संघटना यांनी जराही वेळ न दवडता त्यांनी शिरगापुर गावातील महिलांनी तडक नळदुर्ग पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवून , दारूचे गुथे बंद करण्यात आले आहे. या कामगिरीवर सध्या संपूर्ण गाव एकल महिला संघटनेच् कौतुक करीत आहे, पण या मोहिमेचा प्रसार करून अधिक गावात जाऊन दारूबंदी कशी होईल यावर महिलांकडून काम केलं जातं आहे.

त्यांच्या या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत