एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीची अटक

एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीची अटक

Eknath Khadse's son-in-law Girish Chaudhary arrested by ED

मुंबई : ईडीनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळं हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावाई गिरीश चौधरी हे सध्या ईडीच्या अटकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडीच्या तपासाचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंकडे ईडीनं मोर्चा वळवला आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे. काल (मंगळवारी) गिरीश चौधरी यांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. रात्री उशीरापर्यंत ईडीकडून त्यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशी अंति ईडीकडून त्यांच्यावर रात्री उशीरा अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सध्या ईडीकडून तपास सुरु आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत