उस्मानाबाद शहरात “ताट वाटी आंदोलन”

उस्मानाबाद शहरात “ताट वाटी आंदोलन”

"Taat Vati Andolan" in Osmanabad city

WhatsApp Image 2021 07 01 at 11.50.19 AM

कोरोना परिस्थितीमध्ये नोकरी अभावी अनेक नागरिकांची उपासमार होताना दिसून येते. रोजची कमाई करून पोट भरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते परंतु वाढती महागाई तसेच सरकारद्वारे घालण्यात आलेल्या नियमानुसार “कोरोनापासून वाचण्यासाठी घरी राहा आणि उपासमार करून मारा” ही परिस्थिती दिसून येते. याबाबतीत उस्मानाबाद येथील ‘एकल महिला संघटने’ तर्फे ताट-वाटी आंदोलन करण्यात आले. एकल महिला संघटना ही गेल्या पाच वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्यातील 83 गावात महिलांच्या प्रश्नावर काम करते. ताट-वाटी आंदोलन यामोहिमे बद्दल एकल महिला संघटनेच्या तालुका सचिव कांता शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत सद्य परिस्थितीला धरून होणारी घुसमट व्यक्त करीत आहेत.

या मोर्चामध्ये वाढती महागाई कमी करण्यात यावी, घरेलू कामगार महिलांची घरेलू कामगार महिला म्हणून त्यांचे रीतसर नोंदणी झाली पाहिजे, एकल महिलांचा पेन्शनचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, भाजी विक्रेत्यांना भाजी ओठा तयार करून देण्यात यावा, तसेच वरवंटी गावात महामंडळ बस सेवा सुरु करावी. असे निवेदन देण्यात आले . 30 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या यामोर्चामध्ये उस्मानाबाद तालुका अध्यक्ष प्रतिभा मेटे, तालुका सचिव कांता शिंदे व लक्ष्मी वाघमारे, महानंदा चव्हाण, अनिता नवले, अश्विनी शेळके, अनुसया सरवदे, सुरेखा भोसले व सर्व लीडर महिला यांचा सहभाग होता.

WhatsApp Image 2021 07 01 at 11.50.21 AM

यामध्ये त्यांनी “जगायचं कसं” असा प्रश्न करत कलेक्टर यांना जाब विचारला आहे ते म्हणतात की, कोरोना पासून वाचण्यासाठी घरी रहा, आणि उपासमार करून मरा, ही सद्यस्थिती. जिथे लोक दरमहा काही पैसे कमवत होते, त्यांच्याकडे सध्या 500 देखील नाही. जे रस्त्यावर जाऊन काही सामान विकून पैसे कमवू पाहतात त्यांना दोन तासात धंदा बंद करायला सांगतात, अश्यात ती व्यक्ती काय कमावणार. कमावणार आणि गमावणार यातल अंतर अगदी नाहीस झालं आहे. ज्या ताटात आधी कष्टाची भाकर खायली जायची, त्या ताटात स्वतःचा हतबल चेहरा दिसतो, महागाई मुळे निर्माण झालेला. गेल्या दीड वर्षापासून हे जे काही चाललय ते संपणार तरी कुठे आणि कोण थांबवणार? गॅस, किराणा यांचे भाव वाढत आहेत, बाहेर जाऊन तुम्ही काम करू शकत नाही, सगळीकडे वर्क फ्रॉम होम नावाची सुविधा नाही. पोटातील आणि डोक्यातील आग स्वस्थ बसू देत नाहीये. इतक्या वर्षात अन्याय, त्रास सहन करायचा नाही हे एवढं कळतय. प्रशासनापर्यंत या खाली असणाऱ्या ताट वाट्यांचा खणखणीत आवाजात पोहचवतोय.असे म्हणत त्यांनी हे आंदोलन केले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत