उपवासाचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का ?

उपवासाचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का ?

उपवासाचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का ?

आषाढी एकादशीनिमित्त अनेकांचा उपवास असतो. उपवासाला अनेक पदार्थ तयार केले जातात. यातच उपवासाचे थालीपीठ या पदार्थाला अनेकांची पसंती मिळते. चला तर मग पाहुयात उपवासाचे थालीपीठ बनवतात कसे ?

साहित्य :

तीन वाट्या उपवासाचे भाजणीचे पीठ
एक मोठा बटाटा
चवीपुरते तिखट मीठ
दाणेकूट दोन टे.स्पून
कोथिंबीर थोडीशी चिरून
थोडे तूप

कृती :

बटाटा साल काढून धुवा आणि त्याचा कीस करून तो पाण्यातून काढून पिळून ठेवा. ताटात पीठ, बटाटा कीस, दाणे कूट, तिखट, मीठ कोथिंबीर घेऊन चांगले मळून घट्ट गोळा बनवा. आचेवर तवा ठेवून त्यावर थोडे तूप सोडा. नेहमी प्रमाणे त्यावर थालीपीठ लावा. कडेने तूप सोडा. थालीपीठ उलटून भाजा व गरम गरम खा.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत