उपमहापौर विक्रांत पाटील यांचा १२ जुलै चा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा होणार

उपमहापौर विक्रांत पाटील यांचा १२ जुलै चा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा होणार

Deputy mayor Vikrant Patil's July 12 birthday will be celebrated with a social initiative

नवी मुंबई – प्रभागाच्या विकास कामांसोबतच प्रभागातील समस्या सोडवण्यास नेहमी तत्पर असणारे उपमहापौर आणि प्रभागाचे नगरसेवक विक्रांत पाटील सामाजिक उपक्रमाद्वारे लोकाभिमुख कामे करीत असतात. १२ जुलै रोजी विक्रांत पाटील यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त नेहेमीप्रमाणे विक्रांत पाटील यांच्याद्वारे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

WhatsApp Image 2021 07 11 at 2.29.22 PM 1

“प्रभाग १८ हे आपले कुटुंबचं आहे आणि प्रभागातील सर्व नागरिक हे कुटुंबातील सदस्य आहेत असे विक्रांत पाटील यांचे मत आहे. ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ या अनुषंगाने प्रभागचा कायापालट आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहणारे विक्रांत पाटील आपला वाढदिवस नेहमीच सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात. यंदा देखील उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आपला वाढदिवस पनवेलमध्ये वृद्धाश्रमात ब्लॅंकेट वाटप, गरजूंना फूड पॅकेट वाटप, प्रभागातील विकास कामांचे उदघाटन, वृक्षारोपण, मोफत वृक्ष रोप वाटप आणि नागरिकांसाठी मोफत होमिओपॅथी आरोग्य चिकित्सा शिबीर अशा विविध लोकोपयोगी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करणार आहेत. या सर्व उपक्रमांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती देखील नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत