उन्हाळ्यात या पद्धतीने ताक प्यायल्याने मिळतो कुलकुल अनुभव

उन्हाळ्यात या पद्धतीने ताक प्यायल्याने मिळतो कुलकुल अनुभव

उन्हाळा आला की थंड पदार्थांचे सेवन वाढते. उन्हाळ्यामुळे होणारी शरीराची लाही लाही रोखण्यासाठी थंड पेये आणि पदार्थ मदत आपल्या शरीराला मदत करतात. पण अशावेळी नक्की कोणती पेये प्यावीत हे माहित असणे खूप गरजेचे असते. अनेक जण उन्हाळ्यात कोको कोला, पेप्सी पितात किंवा आईसक्रिम खातात. पण या पदार्थांमधून खरंच शरीराला काही लाभ होतो का? तर नाही. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात अशी पेये पिण्यावर भर दिला पाहिजे ज्यामुळे शरीराची लाहीलाही थांबेल आणि शरीराला त्यांचा फायदा देखील होईल. 

असेच एक पेय आहे ते म्हणजे ताक! हो मंडळी उन्हाळ्यात ताक प्यायल्याने सर्वाधिक फायदा आपल्या शरीराला होतो. हे ताक केवळ मोठ्या व्यक्तींसाठीच उपयुक्त नसून याचा फायदा लहान मुलांना देखील होतो. आज आपण या लेखातून लहान मुलांच्या शरीराला ताक प्यायल्याने मिळणारे फायदे जाणून घेऊया.

सामान्यत: ताक पिणे हे खूप सुरक्षित असते आणि यामुळे कोणतीच अॅलर्जिक रिएक्‍शन देखील होत नाही. परंतु जर एखाद्या मुलाला गायीच्या दुधापासून अॅलर्जी होत असेल तर अशा मुलांना सांभाळूनच ताक प्यायला द्यावे, कारण ताक हे देखील दुधापासूनच तयार होत असते. त्यामुळे त्यात सुद्धा प्रोटीन असते आणि त्याचा परिणाम मुलावर होऊ शकतो. याशिवाय जर लोण्यामधून क्रीम काढून ताक बनवले गेले असेल तर यामुळे लहान मुलाला गळयाचे इन्फेक्शन आणि सर्दी खोकला देखील होऊ शकतो. पातळ दह्यापासून बनलेले ताक सुरक्षित असते कारण त्यात गुड बॅक्टेरिया असतात आणि त्याचे एसिडिक एनवायरमेंट धोकादायक बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखते.

उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि पोषण देण्यासाठी ताक सर्वोत्तम पेय आहे. कोका कोला किंवा अन्य कार्बोनेटेड ड्रिंक पिण्याऐवजी ताक प्यावे. शरीराला हायड्रेट राखण्या सोबतच इलेक्‍ट्रोलाइट, खनिज पदार्थ व व्हिटॅमिन्सची शरीराला असणारी गरज देखील ताक भरून काढते. आयुर्वेदानुसार पातळ दही पासून तयार केलेले ताक पचनासाठी खूप चांगले असते. यात गुड बॅक्टेरिया असतात जे पोटासाठी चांगले असतात. हे बॅक्टेरिया पोट आणि शरीराला हेल्दी राखण्यासाठी मदत करतात. हे बॅक्टेरिया पोटाला इन्फेक्शन पासून देखील वाचवतात.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत