इरफान खान यांच्या आयुष्यातील ‘ते’ २४ तास

इरफान खान यांच्या आयुष्यातील ‘ते’ २४ तास

मुंबई : हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांचा आज २९ एप्रिल रोजी स्मृतिदिन. ते या जगातून जाऊन एक वर्ष झालं. इरफान यांच्या आयुष्यातील अखेरच्या २४ तासांत काय घडलं होतं. परदेशातील हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं, याची कदाचित लोकांना फारशी माहिती नसेल. इरफानचे अखेरचे २४ तासांतील क्षण कसे होते, जाणून घ्य़ा.

एका मुलाखतीत इरफान यांचा मुलगा बाब‍िलने आपल्या वडिलांबद्दल सांगितले होते की, त्याच्या वडिलांना माहिती झालं होतं की, ते वाचू शकणार नाहीत. इरफान यांचे अखेरचे क्षण कसे होते, ते काय म्हणाले? या विषयी बाबिलने सांगितले होते. बाबिल म्हणाला होता की, ‘त्यांच्या मृत्यूच्या आधी दोन ते तीन दिवस मी हॉस्प‍िटलमध्ये होतो. ते आपले शुध्द हरपत चालले होते आणि अंतिम क्षणांमध्ये त्यांनी माझ्याकडं पाहिलं आणि हसले, ते म्हणाले-मी मरणार आहे. ते पुन्हा हसले आणि झोपी गेले.

OIP 6

इरफान खान यांची पत्नी सुतापा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, इरफान यांच्यात कोणते चांगले गुण होते. त्या म्हणाल्या होत्या की, ते कधीही दिखावा करायचे नाही.ते तुमच्यावर रागवले असतील किंवा तुमच्यावर प्रेम करत असतील. जेव्हा ते तुमच्यावर प्रेम करतात आणि आय लव्ह यू म्हणतात, तेव्हा ते दिखावा करत नाहीत. त्यांच्या मनात जोपर्यंत गोष्टी येत नाहीत, तोपर्यंत ते आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवायचे नाहीत.

इरफान खान २ वर्षांपासून न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरवर उपचार घेत होते. परंतु, त्यांनी जगाचा निरोप घेतला.

इरफान खान अखेरचे करीना कपूरसोबत ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटात दिसले होते. यंदा झालेल्या ९३ व्या ऑस्कर ॲवॉर्ड्स (Oscar Awards) सोहळ्यात इरफान खान य़ांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत