इंधन दरवाढ विरोधात उरण तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे सायकल रॅली द्वारे निदर्शने

इंधन दरवाढ विरोधात उरण तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे सायकल रॅली द्वारे निदर्शने

Protests by Uran Taluka and City Congress Committee through cycle rally against fuel price hike

पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा केला काँग्रेसने निषेध

विठ्ठल ममताबादे

उरण- आमदार श्री नानाभाऊ पटोले- अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सुचनेनुसार उरण तालुका व शहर काँग्रेस कमिटी व सर्व सेलच्या वतीने मंगळवार दिनांक 13/07/2021 रोजी सकाळी 11:30 वाजता केंद्रातील भाजपा सरकारचा पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात निषेध करण्यासाठी सामाजिक अंतराचे भान ठेवून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर सायकल रॅली उरण शहर काँग्रेस कार्यालय येथुन पेट्रोल पंप कोटनाका येथपर्यंत काढण्यात आली.सदर निषेध रॅली काँग्रेस नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. काळे कपडे परिधान करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या .

WhatsApp Image 2021 07 13 at 2.42.57 PM

या रॅलीत कामगार नेते महेंद्र घरत,मिलिंद पाडगावकर -जिल्हा उपाध्यक्ष,उमेश भोईर -ओबीसी महाराष्ट्र सरचिटणीस,मार्तंड नाखवा-कोकण अध्यक्ष फिशरमन काँग्रेस,किरीट पाटील-अध्यक्ष उरण शहर काँग्रेस कमिटी,प्रकाश पाटील -शहर उपाध्यक्ष,रेखा घरत-अध्यक्षा उरण तालुका महिला काँग्रेस कमिटी, अफशा मुकरी-अध्यक्षा उरण शहर महिला काँग्रेस कमिटी,अब्दुल शिलोत्री-अध्यक्ष उरण शहर युवक काँग्रेस कमिटी, रोहित घरत-उरण विधानसभा अध्यक्ष, दिपक ठाकूर, श्रेयश घरत व सर्व सेल पदाधिकारी उपस्थित होते.

” प्रचंड प्रमाणात डिझेल, पेट्रोल, गॅसच्या दरात वाढ झालेली आहे. ही दरवाढ अन्यायकारक आहे. अगोदरच जनतेला रोजगार उपलब्ध नाही.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.त्यात महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे.सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. जनतेला दिलासा देण्याऐवजी जनतेवर हुकूमशाही चालली आहे. या हुकूमशाहीचा,पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र येऊन केंद्र सरकारचा निषेध केला आहे.” – महेंद्र घरत, कामगार नेते

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत