इंधनदर वाढीचा सर्वसामान्यांना फटका; पेट्रोल पुन्हा ३५ पैशांनी महागले

इंधनदर वाढीचा सर्वसामान्यांना फटका; पेट्रोल पुन्हा ३५ पैशांनी महागले

rising fuel price hits the common man

नवी मुंबई- इंधनदर वाढीचा फटका सर्व सामन्यांना पडत आहे. मंगळवारी २९ जून रोजी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३५ पैसे वाढ झाली. तर डिझेलचे दर लिटरमागे २८ पैशांनी वाढले असून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये जून महिन्यातील १६वी दरवाढ नोंदवण्यात आली. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक ओरंगाबाद यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली आहे.पेट्रोलच्या दरात आज ३५ पैशांनी वाढ झाली आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सुरू झालेली इंधन दरवाढ अजून कायम आहे. पेट्रोलचे दर लिटरमागे ३४ पैसे, तर डिझेल लिटरमागे ३० पैशांनी महागले. अनेक शहरांमध्ये तर पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. मुंबईतील पेट्रोलचे दर लिटरमागे १०४.९ म्हणजे १०५ रुपयांवर गेले असून डिझेलचे दर प्रति लिटर ९६. ७२ रुपये झाले आहेत. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर १०४. ४८ तर डिझेल ९४. ८३ झाले आहे . नागपूरमध्ये पेट्रोल १०४. ३४ आणि डिझेल ९४. ५६ झाले आहेत तर नाशिकमध्ये पेट्रोल १०५.२४ आणि डिझेल ९५.५६ इतके झाले आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल १०६.१४ आणि डिझेल ९७.९६ आणि कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०५ तर डिझेल ९५. ३५ झाले आहे. या इंधनदर वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार असल्याने नागरिकांमध्ये याबाबत जात आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत