इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

इंग्लंडविरुद्धच्या सर्व प्रारुपांच्या मालिकेसाठी वरिष्ठ महिला निवड समितीने भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळायचे आहेत. भारतीय महिला संघ १६ जूनपासून ब्रिस्टॉल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.

कसोटी मालिकेनंतर पहिला एकदिवसीय सामना २७ जून रोजी ब्रिस्टॉलमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना ३० जून रोजी टाँटन येथे आणि तिसरा एकदिवसीय सामना ३ जुलै रोजी वॉरसेस्टर येथे होईल. यानंतर ९ ते १५ जुलै दरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल.

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघ –

मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक) झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट आणि राधा यादव.

टी-२० मालिकेसाठी संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हार्लिन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक), शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव आणि सिमरन दिल बहादूर.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत