इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटसेना भारतात ८ दिवस राहणार क्वारंटाइन

इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटसेना भारतात ८ दिवस राहणार क्वारंटाइन

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियासाठी कडक क्वारंटाइन नियमावली तयार केली आहे. टीम इंडियाला भारतातील बायो बबलमध्ये ८ दिवस तर इंग्लंडला पोहोचल्यानंतर १० दिवस क्वारंटाइनध्ये राहावे लागणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडला टक्कर देईल. १८ जूनपासून या सामन्याला सुरुवात होईल. भारतातील करोनाची स्थिती पाहता बीसीसीआयला कोणताही धोका पत्करायचा नाही. यासंदर्भात बीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, की क्वारंटाइन कालावधी दोन टप्प्यात होईल. २५ मेपासून हे खेळाडू भारतात बायो बबलमध्ये राहतील. त्यानंतर २ जूनला इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर ते तिथे १० दिवस क्वारंटाइन असतील. चार्टर विमानाने हे खेळाडू एका बबलमधून दुसऱ्या बबलमध्ये जातील. इंग्लंडला पोहोचल्यानंतर हे खेळाडू सराव करू शकतात. यादरम्यान त्यांच्या चाचण्याही होतील. तीन महिन्यांच्या मौठ्या दौऱ्यामुळे भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या मते, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नेतृत्वात २० सदस्यीय भारतीय संघ २५ मे रोजी मुंबईत येईल. ८ दिवस ते इथे तयार केलेल्या बायो बबलमध्ये राहणार आहेत. यावेळी, दोन-तीन वेळा त्यांची करोना चाचणी होईल.

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून मध्यातच माघार घेणारा रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांसह अनेक खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. साऊदम्पटन येथे १८ ते २२ जूनदरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत रंगणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यखतेखालील राष्ट्रीय निवड समितीने ही संघनिवड केली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत