“आ. सुरेश अण्णा धस यांनी मराठा आरक्षणाबाबत आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी व्हा”. – गोपाल चव्हाण

“आ. सुरेश अण्णा धस यांनी मराठा आरक्षणाबाबत आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी व्हा”. – गोपाल चव्हाण

participate in maratha arakshan meeting - gopal chavhan

गेवराई प्रतिनिधी

भाजपाच्या सरकारने दिलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळेच रद्द झाले आहे त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी माजी राज्यमंत्री सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे तरी सोमवारी निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते गोपाल भैय्या चव्हाण यांनी केले आहे.

सविस्तर असे की मराठा आरक्षण प्रश्न माजी राज्यमंत्री सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर दि 28/6/2021 सोमवार रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी युवा नेते गोपाल भैय्या चव्हाण म्हणाले की महाराष्ट्रात आघाडी चे सरकार आले आणि मराठा समाजाला आमच्या भाजप सरकारने दिलेले आरक्षण आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे त्या मुळे सर्व सामान्य जनतेत आघाडी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे ,तरी माजी राज्यमंत्री आ. सुरेश आण्णा धस यांनी आयोजित केलेल्या मोर्चात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते गोपाल भैय्या चव्हाण, किरण शिंदे महेश मस्के, अशोक तौर, भारत तौर, आकाश चव्हाण सुभाष जाधव, सचिन लव्हाळे, बाळासाहेब पवार, बाळू तौर, देवराज कोळे, आदींनी केले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत