आषाढी एकादशी एक सांस्कृतिक परंपरा…

आषाढी एकादशी एक सांस्कृतिक परंपरा…

Ashadhi Ekadashi is a cultural tradition...

पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणतं आजच्या आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी हे पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जातात.

वारी परंपरा आपल्या महाराष्ट्र अनेक वर्षांपासून चालत आली आहे. महिला डोक्यावर तुळस , पुरुष मंडळी हातात भगवी पताका अर्थात भगवा झेंडा, गळ्यात टाळ घेऊन मृदुगांच्या तालावर भजन, गौळण गात हजारो किलोमीटर ऊन,वारा, पाऊस यांना सामोरे जावून विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवतात. असं म्हणतात जगण्याचा अर्थ नेमका काय आहे हे शोधायचं असेल तर नक्कीच एकदा तरी पायी वारी करावी. त्याचे कारण म्हणजे वारीत असणारी संघभावना, एक- दुसऱ्या प्रति आदर, माऊली म्हणतं एक- दुसऱ्यांना दिलेला मदतीचा हात आणि भजन- कीर्तनात दंग होऊन विठ्ठलाला भेटण्याची आस. एक वारी आपल्याला संयम, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, माणसांची पारख कशी करावी,भक्तीत कसे रमून जावे, संतांची शिकवण नेमकी काय आहे ह्या सर्व गोष्टी शिकवून जाते.

आजच्या दिवशी पंढरपूर हे रंगीबेरंगी लायटिंग, रांगोळ्या, टाळ- मृदुगांचा आवाज, कीर्तन- भजन- गौळण या दृश्याने बघायला मिळते. प्रसाद म्हणून काही ठिकाणी जोंधळ्याची भाकरी खाण्यासाठी दिली जाते. केवळ जेष्ठ मंडळी नाही तर आपल्या सारखी तरुण मंडळी देखील वारी अनुभवण्यासाठी येतात. वेगवेगळे नृत्य प्रकार, फुगड्या त्याचबरोबर रिंगण ,घोड्याची शर्यत इकडे बघायला मिळते. वारी करून घरी आलेल्या माणसांच्या पाया पडण्याची परंपरा आजही कित्येक घरात पाळली जाते. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी पायी वारी काय असते हे अनुभवण्यास काही हरकत नाही.

प्रद्युम साळुंखे (साधना विद्यालय)
सलाम बॉम्बे फाउंडेशन- मीडिया अकादमी

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत