आषाढी एकादशीचा सोहळा एमईएस विद्यामंदिर मध्ये उत्साहात साजरा

आषाढी एकादशीचा सोहळा एमईएस विद्यामंदिर मध्ये उत्साहात साजरा

आषाढी एकादशीचा सोहळा एमईएस विद्यामंदिर मध्ये उत्साहात साजरा

नवी मुंबई – सीबीडी बेलापूर येथील एमइएस विद्यामंदिर शाळेत आषाढी एकादशीचा सोहळा सोमवारी दि. १९ जुलै २०२१ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी शिंदे यांनी पालखीचे व विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन केले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यांनी दिलेले संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावेत यासाठी विद्यार्थी व पालकांना संताच्या कार्याची माहिती सांगण्यात आली. तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने आषाढी एकादशीनिमित्त संतांच्या संस्कारांचे महत्त्व सांगितले.

WhatsApp Image 2021 07 21 at 2.22.26 PM 3 1

आषाढी एकादशीनिमित्त इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमधून निवडक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या वेळी आळंदीमधील अध्यापक वारकरी शिक्षण संस्थेमधील ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे यांचे ऑनलाईन कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यांनी भक्तीचे महत्व, ज्ञान हाच देव, संतांची शिकवण, मोठ्यांचा आदर, शिक्षक व शाळेविषयी प्रेम अशा विविध मूल्यांचे महत्व विशद केले.

WhatsApp Image 2021 07 21 at 2.22.26 PM 2 1

शिक्षकांनीही अतिशय आनंदाने शाळेतच पालखीची लहानशी मिरवणूक काढली, यावेळी शिक्षिकांनी डोक्यावर तुळस घेऊन पालखीच्या भोवती ‘ज्ञानोबा-माऊली तुकाराम’ चा जयघोष केला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत