आर्या वनौषधीचा वटपौर्णिमा व आयुर्वेद जनजागृती कार्यक्रम

आर्या वनौषधीचा वटपौर्णिमा व आयुर्वेद जनजागृती कार्यक्रम

the awarness of vatpournima and ayurved program by arya vanuashadhi

नवी मुंबई- वटपौर्णिमेला वटवृक्षाची रोपं लावून व वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा छोटा प्रयत्न आर्या वनौषधी संस्थेच्या वतीने करण्यात आला.
वटपौर्णिमेचे औचित्य साधून यावेळी वटपौर्णिमा व आयुर्वेद या विषयावर जनजागृती कार्यक्रम देखील घेण्यात आला. सदर कार्यक्रमात आर्या प्रहरचे प्रतिनिधी दत्तू कोल्हे यांच्या हस्ते वडाचे औषधी गुणधर्म व उपयोग याविषयी माहिती असलेली पत्रके महिलांना व नागरिकांना वाटप करण्यात आली.

निसर्गताच दीर्घायुषी व धार्मिक महत्व असणाऱ्या वड या वृक्षाचे संवर्धन व जतन व्हावे या हेतूने सदर कार्यक्रम घेण्यात आला.असे संस्थेचे अध्यक्ष व आर्या प्रहरचे संपादक प्रा.सुधीर पाटील यांनी यावेळी सांगितले.पर्यावरणाच्या दृष्टीने वडवृक्षाचे महत्त्व खूपच आहे.वड हा मानवासाठीही खूपच उपयुक्त आहे.या वृक्षांची पाने,फळे,चीक,मुळ औषधात वापरतात.मूत्राघात,श्वेतप्रदर,प्रमेह,मेदवृद्धी,विर्यविकार,जंत,वंध्यत्व,अतिसार,आमांश,व्रण,मूळव्याध,नेत्रविकार,केसविकार,संधिवात आदी अनेक विकारावर वड उपयुक्त आहे असेही सुधीर पाटील यांनी यावेळी सांगितले.वटपौर्णिमेला वड या वृक्षांची तोड न करण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले होते या आवाहनाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असेही सुधीर पाटील यांनी या वेळी सांगितले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत