‘आरोग्यम् धनसंपदा!!!….

‘आरोग्यम् धनसंपदा!!!….

आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तरीसुद्धा आपण आपल्या आरोग्याकडे योग्य त्या रीतीने लक्ष देत नाही. आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वांची गरज असते, म्हणूनच रोज पोषक असा आहार घेणे गरजेचे आहे. फळे आणि हिरवा भाजीपाला तृणधान्य कडधान्य हे रोजच्या आहारात असणे तितकेच गरजेचे आहे. त्याचबरोबर वाढत चाललेले प्रदूषण.प्रदूषण हा एक घटक असला तरी सबंध दिवस ए.सी. लावलेल्या खोलीत बसून काम करणं, शारीरिक व्यायाम नाही, कामाचा ताण इत्यादींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. कळत नकळत याचा परिणाम आपल्या मनावर सुद्धा होतो आणि मनाच आरोग्य बिघडलं तर शरीराचं बिघडतं. त्याचे परिणाम कधी लवकर दिसतात तर कधी उशिरापण दिसतात हे नक्की. आयुष्यातील आव्हानं सहज पेलण्याकरिता, मानसिक, सामाजिक आरोग्य उत्तम राखण्याकरिता वेळ काढून शारीरिक व्यायाम, मन प्रसन्न राहण्याकरिता छंद जोपासणे गरजेचे आहे..

तुम्ही आजारी पडत नाही, याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहात, असा होत नाही. तर दैनंदिन घडामोडी तुम्ही किती अॅक्टिव्हली पार पाडता, यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. उदा. वजन कमी करणं, फिट राहणं, धाप न लागता जिने चढणं, ताण न येणं, खाण्याच्या योग्य सवयी. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशी येत असतील, तर अर्थातच तुम्ही फिट नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे वेळेतच आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या.

आज कालचे जीवन इतके व्यस्त झाले आहे की माणसाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे सोडून दिले आहे आणि या रोजच्या जीवन प्रवासात आरोग्याकडे लक्ष देण्यास सुद्धा फुरसत मिळत नाही.. परंतु आज जगभरात एका न दिसणाऱ्या व्हायरसने (कोरोना) जो हाहाकार माजवला आहे..त्याने दाखवून दिले आहे की आपले आरोग्य किती महत्त्वाचे आहे. आज प्रत्येक जण या कोरोनाच्या भीतीने घरी आहे आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे.. पोषक आहार सुद्धा घेत आहेत नाहीतर हल्लीच्या दिवसात पिझ्झा,बर्गर,वडापाव,समोसा यावर सुद्धा दिवस निघून जायचा. खरंच हा विषाणू आला खरं.. अनेकांचे जीव सुद्धा घेतले याने, भीतीने का होईना माणूस स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागला. खरंच आपला आरोग्य इतका स्वस्त नाही आहे म्हणूनच आपण आपल्या आरोग्याकडे योग्य रीतीने लक्ष द्यायला हवे काळजी घेतली पाहिजे. आरोग्य म्हणजे काय??याची जाणीव या विषाणूमुळे (कोरोना)माणसाला झाली आहे. माणसाला आयुष्यभराची अद्दल घडली असे म्हणायला हरकत नाही यानंतरही तो आपल्या आरोग्याकडे असेच लक्ष देईल असे निर्दशनास येते…!  

                                                                                                                                       प्रतिनीधी :- साक्षी चव्हाण

Related Articles

1 Comment

Avarage Rating:
  • 0 / 10
  • pradip , ऑक्टोबर 29, 2020 @ 4:51 am

    mast

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत