आम्ही दोघंही आत्महत्या करत आहोत… आमच्या आत्महत्येला पुढील कारणं जबाबदार आहेत.

आम्ही दोघंही आत्महत्या करत आहोत… आमच्या आत्महत्येला पुढील कारणं जबाबदार आहेत.
arnav

आम्ही दोघंही आत्महत्या करत आहोत…
आमच्या आत्महत्येला पुढील कारणं जबाबदार आहेत.

आमची कंपनी काँकर्ड डिझाइन्स लिमिटेड आहे.
या कंपनीचे आम्ही दोघंही अन्वय नाईक आणि कुमुद नाईक व्यवस्थापकीय संचालक आहोत
आमचे पैसे पुढे नोंद केलेल्या कंपन्यांच्या मालकांनी अडकवून ठेवले आहेत
त्यांनी ते पैसे अद्यापही दिलेले नाहीत

१) अर्णब गोस्वामी रिपब्लिक टीव्ही चे प्रमुख ह्यांनी स्टुडिओचं डिझाईन
केल्याचे ८३ लाख रुपये दिले नाहीत

२) फिरोज शेख स्काय मीडिया चे प्रमुख ज्यांनी ४०० लाख (४कोटी) रुपये
अंधेरीतल्या आयडिया स्क्वेयर प्रोजेक्टच्या लक्ष्मी बिल्डिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचे काम
केल्याचे पैसे दिले नाहीत.

३)नितेश सरडा स्मार्ट वर्क्स कंपनीच्या प्रमुखांकडून ५५ लाख रुपये देणं बाकी आहे.

कृपया यांच्याकडून पैसे परत मिळवावेत आणि हे सर्व आमच्या मृत्यूला
जबाबदार आहेत ते पैसे आमच्या कामगारांना द्यावेत.
अन्वय नाईक

(वरील सुसाईड नोट मुद्दामच ह्या लेखात घेतले आहे कारण
आपल्याला अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या
आत्महत्येचं कारण स्पष्ट कळावे.)

खालील तारखांवर आवर्जून लक्ष्य द्या !

मे २०१८ मध्ये या दोघं मायलेकांनी आत्महत्या केली
त्याचं कारण सुसाईड नोट मध्ये अन्वय यांनी सांगितले आहे.
२०१८ च्या ह्या प्रकरणाला २०१९ मध्ये
भाजप आणि शिवसेना युतीतून सत्तेत असतांना एप्रिल २०१९
मध्ये निराधार सांगून बंद करण्यात आले
नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्ता पालटली
आणि महाविकास आघाडी सत्तेवर आली.
त्यानंतर पुन्हा मे २०२० मध्ये अन्वय यांच्या मुलीने
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली
आणि त्यानंतर भाजप काळात बंद झालेलं प्रकरण
पुन्हा ओपन करून CID कडे सोपवण्यात आले.
४ नोव्हेंबर २०२० ला अर्णब गोस्वामी ला झालेल्या अटकेप्रकरणी
काही जणांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर सूड बुद्धीने
हि केस ओपन केल्याची मतं व्यक्त केली आहेत
त्यात आपले केंद्रीय सूचना तथा प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
आणि गृहमंत्री अमित शहा यांचा देखील समावेश आहे.
तथा कथित पत्रकार अर्णब याला अटक होणे म्हणजे
फ्रीडम ऑफ प्रेस वर हल्ला होणे कसं असू शकतं हेच मला कळले नाही.

पत्रकार गौरी लँकेशा यांच्यावर जेव्हा गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात येते
तेव्हा ट्विटर वर ‘एक कुतिया कुत्ते की मौत क्या मरी सारे पिल्ले एक सूर मे बिलबिला रहे है’ लिहणाऱ्या निखिल दधीच याला देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी फोल्लोव करतात आणि निखिल दधीच याचे स्मृती इराणी सोबत फोटो दिसायला लागतात.

पत्रकार गीता सेशु आणि उर्वशी सरकार यांनी ” गेटिंग एव्ह विथ मर्डर ” नावाच्या अहवालात लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची स्थिती चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले आहे.
ह्या अहवालानुसार २०१४ ते २०१९ मध्ये ४० पत्रकारांचा खून करण्यात आला असून १९८ पत्रकारांवर गंभीर हल्ले करण्यात आले आहेत.
ह्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल सत्ताधाऱ्यांना काळजी का वाटू नये ह्याच उत्तर अजून कोड्यातच असेल.

अर्णब गोस्वामी च्या अटकेप्रकरणात अर्णब हा पत्रकार नसून एक आरोपी आहे.
त्यावर २ व्यक्तींना आत्महत्या करण्यासाठी भाग पडल्याचा आरोप आहे.
“साध्य शब्दांत सांगायचं झालं तर एवढच कि अर्णब ने अन्वय यांना स्टुडिओ डिझाईन चा ठेका दिला होता
आणि त्याचे पैसे न मिळाल्याचा आरोप सुसाईड नोट मधून करत अन्वय ने आत्महत्या केली”
ह्या प्रकरणात अर्णब ने कुठल्याही प्रकारच्या पत्रकाराची भूमिका बजावलेली नाहीये
अर्णब कॉन्ट्रॅक्ट देणारा होता आणि अन्वय कॉन्ट्रॅक्ट घेणारा.
ह्या प्रकरणात अर्णब पत्रकार नसून एक आरोपी आहे.
आणि त्याच आरोपांवर पडदा टाकायचं काम राजकीय पक्षांची आंदोलने आणि मोर्चे करत आहेत.
सामान्य माणसाने नीट विचार केला तर एक प्रश्न नक्कीच पडेल कि
कोणताही पत्रकार अर्णब च्या समर्थनार्थ आंदोलन तथा मोर्चे करत नाहीये
फार फार केला तर ते एकाच माळेचे मणी प्राईम टाइम मधून अर्णब कसा योग्य आहे
हे दाखवणार नाहीत परंतु राज्य सरकार किती वाईट आहे हे नक्की दाखवतील
कारण माणसाची योग्यता सांगायला योग्यता असणंही तितकाच महत्वाचं आहे.
राज्य सरकार ला माझं समर्थन आहे अश्यातला काही भाग नाही परंतु न्यायपालिकेवर
लोकांचा विश्वास टिकून राहणं गरजेचे आहे.त्यामुळे ह्या प्रकरणात निःपक्ष तपास व्हावा अशी अशा आहे.
अर्णब हा नाईक कुटुंबीयांचा गुन्हेगार आहे कि नाही हे न्यायालय ठरवेलच
परंतु अन्य पत्रकारांच्या मृत्यूवर मूग गिळून बसलेले
अर्णब च्या अटकेवर पोपट कसे झाले ह्या प्रश्नाने निदान बाकीच्या पत्रकारांना तरी सतावले पाहिजे
त्याचबरोबर पत्रकार आणि कुत्रकार यांतील फरक समजून घेऊन
जनतेने उघड्या डोळ्यांनी आपले समर्थन कोणाला असावे हे ठरवले पाहिजे.

:- आकाश कांबळे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत