आदिवासी बांधवांना खावटी योजने अंतर्गत अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप

आदिवासी बांधवांना खावटी योजने अंतर्गत अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप

आदिवासी बांधवांना खावटी योजने अंतर्गत अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप

(विठ्ठल ममताबादे

उरण – आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदिवासी विभागातील पात्र लाभार्थीनां मिळणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या खावटी अनुदान योजने अंतर्गत संपूर्ण उरण तालुक्यातील एकूण 855 लाभार्थी कुटुंब असलेल्या आदिवासी वाड्यांवर दिल्या जाणाऱ्या अन्नधान्य ,कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्यां मटकी,चवळी,हरभरा, पांढरा वाटाणा ,तूरडाळ,उडीदडाळ मिर्चीपावडर, गरममसाला,मीठ, साखर,शेंगदाणा तेल, चहापावडर ह्या वस्तूंच्या किटच्या वाटपाचा शुभारंभ आज उरण तालुक्यातील वेश्वी आदिवासी वाडीवरील आश्रम शाळेत झाला. यावेळी 65 पात्र लाभार्थी कुटूंबाना खावटी वाटपाचा कार्यक्रम पार पाडला.

WhatsApp Image 2021 07 17 at 1.03.22 PM
 समाज्यापासून वंचित आणि उपेक्षित असणाऱ्या दूर- दुर्गम ,डोंगर दऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना समाज्याच्या मूळप्रवाहात आणण्या करीता आज महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत.सोबतच अनेक सामाजिक संस्था,सामाजिक कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी जपतं आपल्या परीनं जेवढी होईल तितकी मदत करून ह्या आदिवासी बांधवांना समाज्याच्या मूळप्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. ह्या कार्यक्रमा करीता उपस्थित असलेले मान्यवर हे सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून एकत्र आलेली होती.ह्या कार्यक्रमा करीता महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्या वतीने उपस्थित अधिकारी तालुका प्रमुख- दत्तात्रय पाटील, आप्पासाहेब मोरे,वेश्वी गावचे नवनिर्वाचित सरपंच संदीप कातकरी,रायगड भूषण राजू मुंबईकर,सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक राजेंद्र मढवी,शिक्षक-रमणिक म्हात्रे, अनिल घरत आणि सर्व आश्रमशाळेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांना आधार ठरणाऱ्या ह्या खावटी योजनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

author

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत