महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत काही शंका आहेत का?? एकदा नक्कीच क्लिक करून पाहा

महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत काही शंका आहेत का?? एकदा नक्कीच क्लिक करून पाहा
Maharashtra CM

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर ठाकरे सरकारने अनेक निर्बंध राज्यात लागू केले. राज्यात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध आहेत. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सोडल्यास बाकी कशालाही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. तसेच त्यावर ठाकरे सरकारने नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे ही दिली आहेत.

घरकाम करणारे, वाहनचालक आणि स्वयंपाकी कामावर येऊ शकतात का? रेल्वे आणि बसने प्रवास करू शकतात का?
प्रत्येक शहरांत संसर्गाची वेगवेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे याबाबतीत स्थानिक प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा.

महाराष्ट्रांतर्गत खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य आहे का?
ब्रेक द चैन ह्या मोहिमेत स्पष्टपणे नमूद केले आहे की कोणत्याही योग्य व आवश्यक कारणास्तव प्रवास करू नये. तुम्ही सार्वजनिक वाहनांचा प्रवेश करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता.

वाईन शॉपस आणि सिगारेटची दुकाने उघडी असतील का?
नाही. केवळ आवश्यक असणारीच दुकाने उघडी राहू शकतील.

नागरिक सकाळ आणि संध्याकाळ फिरायला चालायला जाऊ शकतात का?
नाही.

सिमेंट, रेडि मिक्स, स्टील हे बांधकाम साहित्य खुलेपणाने चालू राहणार का?
आदेशात नमूद केल्याप्रमाणे संबंधित बांधकाम स्थळ सुरू ठेवण्यास परवानगी असेल तर त्यासाठी लागणारे साहित्य ने आण करू शकतो. साहित्यांची ऑर्डर दूरध्वनीद्वारे किंव्हा ऑनलाईन पद्धतीने मागवू शकतो. मात्र कुठलेही बांधकाम साहित्याचे दुकान सुरू ठेवण्यात येणार नाही.

कुरिअर सेवा सुरू राहील का?
फक्त आवश्यक कारणांसाठी कुरिअर सेवा सुरू राहील.

प्राणी तसेच लोकांसाठी मदतीचे काम करण्याऱ्या स्वयंसेवी संस्थेचे काय?
स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेशिवाय त्यांना काम सुरू ठेवता येणार नाही.

poli

वस्त्रद्योग आणि कपडे उद्योग सुरू ठेवता येणार का?
नाही.

१९ एप्रिल रोजी होणारी एमबीबीएस परीक्षा होणार का?
परीक्षा आयोजित करण्याविषयी संबंधित विभाग योग्य तो निर्णय घेईल. तसेच विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच्या माध्यमातून ये-जा करता येईल आणि त्याच्यासोबत प्रौढ व्यक्ती असेल तरी मान्यता देण्यात येईल.

आवश्यक ई-कॉमर्स म्हणजे नेमके काय?
सर्व प्रकारच्या वस्तू व सेवा ज्या आवश्यक यादीत येतात. उदा; किराणा, औषध, अन्न पदार्थ इत्यादी इ कॉमर्स मार्फत वितरित केले जाऊ शकते.

डेंटिस्ट चे दवाखाने सुरू असतील का?
होय.

स्टेशनरी आणि पुस्तकांची दुकाने सुरू राहणार का?
नाही.

ट्रॅव्हल कंपन्या व सेवा सुरू राहतील का? ट्रॅव्हल, पासपोर्ट आणि व्हिसा सेवांचे काय?
ट्रॅव्हल एजेन्सिज दुकान सुरू ठेवून काम सुरू करू शकणार नाहीत. मात्र ऑनलाईन काम करू शकता. आपण एक खिडकी योजनेतील सर्व सुविधा जसे की व्हिसा, पासपोर्ट सेवा, सर्व शासकीय सेतू केंद्र हे शासनाचा एक भाग म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

आयातदार आणि निर्यातदार यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र या निर्यातदारांना कामासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या वस्तू किंव्हा सेवा देणारे सुरू ठेवू शकतील का?
नाही. केवळ आवश्यक वस्तूंची आयात करणे अपेक्षित आहे. इतर आयात वस्तूंचा साठा करून ठेवावा लागेल.

आवश्यक वस्तूंचा पुरवठा दुकानांना करण्यासाठी त्या व्यक्तीस रॅपिड अँटीजेन चाचणी करावी लागेल का?
नाही.

रस्त्यावरील खाद्यविक्रेते दुकाने सुरू ठेवू शकतील का?
सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत पार्सल आणि घरगुती वितरणस मान्यता देण्यात आली आहे.

freepressjournal 2020 03 4a6aa428 11de 443c bb57 dd871de516ca 2503 pti25 03 2020 000228b

मोठ्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये मायक्रो कंटेनमेंट जाहीर केली जाऊ शकते का?
सोसायटीच्या आवारात ५ पेक्षा जास्त व्यक्ती कोविडग्रस्त आढळल्यास ते क्षेत्र मायक्रो कंटेनमेंट घोषित करण्यात येईल. कंटेनमेंट घोषित करण्याचा उद्देश म्हणजे या क्षेत्रात प्रवेश करणारे आणि बाहेर जाण्यावर नियंत्रण आणणे आणि इतरांना संसर्ग होणार नाही यासाठी भाग वेगळा करता येईल.

पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा पेट्रोल पंप्स, एव्हिएशन स्टेशन्स, एलपीजी बॉटलिंग प प्लांट हे आवश्यक सेवेत येतात का?
होय.

सर्वसामान्य नागरिक लोकल सेवा करू शकतील का?
होय. आदेशात दिलेल्या वैद्य कारणांसाठी सर्वसामान्य नागरिक लोकल सेवा करू शकतो.

बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेचे काय?
आवश्यक सेवा असल्याने त्या सुरूच राहतील आणि त्यातून कोणीही प्रवास करू शकेल.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत