आज बाळा साहेब हवे होते…!!!

आज बाळा साहेब हवे होते…!!!

भारतातील समस्त हिंदुच स्वप्न असलेलं राम मंदिर अखेर बनणार या वर शिक्का मोर्तब झाला.अनेक वर्षे चाललेला खटला अखेर संपला आणि रामाचा वनवास खऱ्या अर्थाने संपला अस म्हणता येईल. सुमारे तीन दशकांचा संघर्षाला पूर्ण विराम मिळाला.आणि काल राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.संपूर्ण अयोध्या नगरी नव्या नवरी सारखी सजवण्यात आली.भूमीपूजनाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.हा दिवस हिंदू हृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्ती चा दिवस पण या दिवशी बाळा साहेब आपल्यात नाहीत हे आपलं दुर्दैव म्हणायला लागेल. हे त्यांचं स्वप्न पूर्ण होताना त्यांनी पाहायला हव होत.ह्या सोहळ्या कडे अनेकांचे डोळे लागले होते.भारतीय इतिहासाची जेव्हा जेव्हा उजळणी होईल तेव्हा राम मंदिराच्या ऐतिहासिक सोहळ्याचे नाव नक्कीच सुवर्ण अक्षरात लिहले जाईल. असा हा भव्य दिव्य सोहळा होताना बाळा साहेब असायला हवे होते. राम मंदिरा साठी अनेकांनी प्रयत्न केले, बलिदान दिली परंतु खऱ्या अर्थाने जर कोणी जीव ओतला असेल तो बाळा साहेबांनी.६डिसेंबर ला जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा बाळा साहेबांच्या नेतृत्वा खाली शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात कार्यदान केलं.गर्व से कहो हम हिंदू हे हा नारा सुद्धा त्यांनी सुरू केला. त्या वेळेस च्या अनेक मुलाखतींमधून सुद्धा ते म्हणाले होते की ‘आम्ही बाबरी मशीद पडलेली नसून जमिनी खालचं आमचं राम मंदिर आम्ही वर काढलेलं आहे, यात लाज वाटण्याचं कारण नाही, ही अभिमानाची च गोष्ट आहे ‘. काल झालेल्या भूमिपूजनानंतर बाळा साहेब सुखावले असतील एवढं मात्र नक्की. काल च्या सोहळ्यात अनेकांनी बाळा साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राम मंदिरा संबंधित बाळा साहेबांचं कार्य च इतकं अतुलनीय आहे की कोणाला ही त्या वेळेस स्वतःच्या आठवणींना आवर घालता आला नसणार.म्हणून च आज बाळा साहेब हवे होते.
नमिता पवार

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत