आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस

8144FE4D 863A 4F8E B543 01FD3F166884

आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस गेल्या 62 वर्षांपासून 30 सप्टेंबर आज रोजी साजरा केला जातो. हा दिवस भाषा अनुवाद काम करणाऱ्या लोकांसाठी चा असून जे संवाद, समझ आणि सहयोगाची भूमिका बजावतात. यामुळे विकास आणि विश्व् शांती तसेच सुरक्षा मजुबत राहण्यासाठी मदत होते. हा दिवस बायबल चे अनुवादक सेंट जेरोम फिस्ट चे प्रतीक आहे. ज्यांना अनुवादकांचा संरक्षक संत म्हंटले जाते.
अनेक देशांना एकत्र आणणे, संवाद करणे किंवा सहयोगा साठी अनुवादाचे महत्व पटवून सांगणे. यामुळे विश्व् शांती आणि विकास होण्यास मदत होते. पूर्वी अनुवादला केवळ भाषेची गतीविधी मानली जायची पण सध्या मात्र या अनुवादला राष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्व पूर्ण मानले जाते कारण यामुळे अनेक देश एकत्र येऊन त्यांच्यात देवाण घेवाण होण्यास मदत होते.
संयुक्त राष्ट्र द्वारा या दिवशी अशा लोकांचा गौरव करण्यात येतो जे आंतर राष्ट्रीय कृतनीती मध्ये संवादातील भाषा विशेषज्ञ च्या रूपात कार्य करत असतात. साहित्यिक व वैज्ञानिक कार्याच्या शुद्ध आणि स्पष्ट अनुवाद कार्याला देखील अधिक महत्त्व दिले जाते. विविध भाषा संरक्षण संदेश देण्यातून हा अनुवाद दिवस साजरा केला जातो.

राजीव अभंग
साधना विद्यालय
मीडिया अकादमी
इयत्ता नववी

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत