आंतरजिल्हा किंव्हा आंतरराज्य असा प्रवास करणाऱ्या नागरिकांनसाठी अशा प्रकारे काढावा लागणार ई-पास

आंतरजिल्हा किंव्हा आंतरराज्य असा प्रवास करणाऱ्या नागरिकांनसाठी अशा प्रकारे काढावा लागणार ई-पास

महाराष्ट्र,(दि. २३ एप्रिल २०२१): राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. १३ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशांनंतर २२ एप्रिल पासून त्यामध्ये कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य असा प्रवास करणाऱ्यांसाठी काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली असून अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली असून त्या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

अशा प्रकारे काढा ई पास?

याआधी देखील ई-पास काढण्यासाठी अशाच प्रकारे संकेतस्थळाचा पर्याय देण्यात आला होता. त्यावर ई-पास काढण्यासाठी अर्ज करण्यासाठी आणि पास मंजूर झाल्यास तो डाऊनलोड करण्यासाठी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.

१. आपल्या ब्राऊजरमधून https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जाऊन. याच पेजवर तुम्हाला ई-पाससाठी अर्ज करण्याची आणि तो डाऊनलोड करण्याची लिंक दिसेल. संदर्भासाठी खाली फोटो पाहा.

725a1198 c27a 4c51 b2bc e8d8208eb508

२. या पेजवर दोन पर्याय असतील. त्यामध्ये जर तुम्ही नव्याने ई-पास करण्यासाठी अर्ज करत असाल, तर Apply For Pass Here या बटणावर क्लिक करा.

cabebbfb bdd2 40ec 9256 4819392c5220

३. पुढच्या पेजवर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का? अशी विचारणा केली जाईल. आपल्याला हवा तो पर्याय त्यातून निवडा. इथे फक्त आंतरजिल्हा प्रवास करायचा असल्यास नाही असा पर्याय निवडा.मात्र, राज्याबाहेर जायचे असल्यास हो पर्याय निवडा. इथे तुम्हाला तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची ही संख्या निवडावी लागणार आहे.

7e00ad6e fe56 4299 8748 696790a1b8b8

४. पुढच्या पेजवर तुम्हाला प्रवासासंदर्भात सर्व माहिती भरावी लागेल. यामध्ये तुमचं नाव, प्रवासाची तारीख, मोबाईल क्रमांक, प्रवासाचं कारण, वाहनाचा प्रकार, वाहनाचा क्रमांक, सध्याचा पत्ता, इमेल आयडी, प्रवास सुरू होण्याचे ठिकाण, प्रवासाचं शेवटचं ठिकाण, तुम्ही सध्या कंटेनमेंट झोनमध्ये आहात का? परतीचा प्रवास यासंदर्भातली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे.

5b9b5dec f4bc 46b1 ace4 f08cbb9ec6dc

या फॉर्मच्या खालीच तुमचा फोटो जोडण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. त्यासोबतच आधार कार्ड, वैद्यकीय कागदपत्रे (उपचारांसाठी जात असाल तर) अशी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. त्यासोबत डॉक्टरकडून घेतलेलं तुमचं फिटनेस सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी देखील लिंक देण्यात आली आहे.वरील सर्व माहिती भरल्यानंतर खाली Submit बटणावर क्लिक केल्यास तुमचा ई-पाससाठीचा अर्ज जमा होईल. त्याच एक टोकन आयडी तुम्हाला मिळेल.

b86cb23c 3838 45b8 bbd4 c4c3f8a34314

५. आपला अर्ज मंजूर झाला किंवा नाकारला गेला याचा तपशील पाहण्यासाठी पहिल्या पेजवरच्या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला माहिती मिळवता येईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळालेला टोकन आयडी टाकून अर्जाचा तपशील तुम्हाला पाहाता येईल. अर्ज मंजूर झाला असल्यास मिळालेला पास डाऊनलोड करण्याची लिंक देण्यात येईल. तिथून अर्ज डाऊनलोड करून घेता येईल.

cabebbfb bdd2 40ec 9256 4819392c5220 1

दरम्यान, ऑनलाईन प्रक्रियेसोबतच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील प्रवासासाठी पास मिळवता येऊ शकतो असे देखील पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पासचा वापर केवळ आपातकालीन परिस्थितीतच करावा, असे देखील सांगण्यात आले आहे.

c356c928 2bf1 4ee3 836b 6e08aae5b056
author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत