अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे अडकले विवाहबंधनात

अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे अडकले विवाहबंधनात

All-rounder Shivam Dubey got married

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हे आज विवाहबंधनात अडकले आहेत . शिवम दुबे याने आज त्याची गर्लफ्रेंड अंजुम खान हिच्यासोबत विवाह केला
विवाहानंतर शिवम दुबेने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून याची माहिती सर्वांना दिली. विवाहसोहळ्यात शिवम दुबे याने मुस्लिम रीतीरिवाजही लग्न पार पाडले. तसेच पत्नी अंजुम खान हिच्यासोबत दुवा मागितली.

shivam dube 1572763148

विवाहाचे फोटो शेअर करताना शिवम दुबे म्हणाला की, आम्ही प्रेम केलं. ते प्रेमापेक्षाही अधिक होते. आता येथूनच आमची नवीन सुरुवात होत आहे.यावेळी शिवम दुबे याने मुस्लिम रीतीरिवाजांनुसारही निकाह केला. विवाहाची माहिती समोर आल्यावर शिवम दुबेचा सहकारी खेळाडू श्रेयस अय्यर याने त्याला शुभेच्छा दिल्या. शिवम दुबे आणि श्रेयस अय्यर देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतात.

7ui290hg shivam dube

शिवम दुबे सध्या भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्याने भारतासाठी एक एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत शिवम दुबेची एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये १३.५ एवढी सरासरी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला गोलंदाजीत यश मिळालेले नाही. मात्र टी-२० मध्ये त्याने ५ बळी मिळवले आहेत. मात्र सुमार कामगिरीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर जावे लागले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत