अवघ्या ४ तासात गुन्हेगारांना पकडण्यात जव्हार पोलिसांना यश

अवघ्या ४ तासात गुन्हेगारांना पकडण्यात जव्हार पोलिसांना यश

जव्हार तालुक्यातील आळीवमाळ या गावातील देवराम रावजी नाकरे वय ३८ वर्ष हा व्यक्ती दि.३१ मे रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबाकडून जव्हार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती या सदर व्यक्तीचा शोध सुरू असताना हेदिलपाडा या जंगलात एका गोनीत देवराम नागरे यांचा मृतदेह सापडला .
दिनांक 6 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास गावातील पोलीस पोलीस पाटील यांनी पोलिसांना फोन करून हेदीलपाडा जंगलात काहीतरी संशयित असल्याचे कळविले याच घटनेचा शोध घेण्याकरिता पोलिसांच्या पथकाने चौकशी केली असता सदर गोणीत देवराम नाकरे यांचा मृतदेह आढळला हा मृतदेह साधारण ५० फूट खोल दरीत एका झाडाचा बुंधा खाली असलेल्या खोलगट भागात टाकुन कोणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून या मृतदेहाच्या गोनीवर मोठ्या प्रमाणात दगड टाकण्यात आले होते या मृतदेहावरील दगड स्थानिकांच्या मदतीने ते बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आला या घटनेसंदर्भात अज्ञात मारेकरांवर जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जव्हार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी व पोलीस निरीक्षक ए.बी. लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून या पोलिस पथकाने ताबडतोब शोध घेऊन संशयित आरोपींची कसून चौकशी करण्यात आली व तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अवघ्या चार तासात खुनाचा गुन्हा उघड करण्यात जव्हार पोलिसांना यश मिळाले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत